मराठी चित्रपट आणि मालिकांत आघाडीची नायिका म्हणून अभिनेत्री किशोरी गोडबोले यांच्याकडे पाहिलं जातं. आता मराठी सोबतच त्या अनेक हिंदी मालिकांत देखील झळकताना पाहायला मिळतात. एक दो तीन, खिडकी, मेरे साई, मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि यांसारख्या अनेक मालिकांत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. तर फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन अश्या काही चित्रपटांतून त्यांनी अभिनय साकारला आहे. अभिनेत्री किशोरी गोडबोले या मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची मुलगी आहे.

अभिनेत्री किशोरी गोडबोले यांचे पती सचिन गोडबोले हे मोठे उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांचा बिजनेस देखील खूपच हटके आहे. भारतीय दिवाळी फराळ सोबत ड्राय फ्रुट आणि इतर पदार्थ ते भारताबाहेरील मराठी आणि इतर भारतीय लोकांपर्यंत पोहतचवण्याचे काम करतात. त्याचा हा बिजनेस आता कोट्यवधींच्या घरात जाऊन पोहचला आहे. अद्ययावत सुविधा असलेलं दादर येथे मराठी माणसाचं घरगुती पदार्थांचं गोडबोले स्टोअर्स त्याने उभे केले. बघता बघा काही हजारांचा बिझनेस त्याने कोट्यवधींच्या उलाढालीत रूपांतरित केला. त्यांच्या दिवाळी फराळाला तर चक्क परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. अगदी जेव्हा लग्न होऊन माधुरी दीक्षित परदेशात स्थायिक झाली होती त्यावेळी तिच्या घरी गोडबोलेंचाच फराळ पोहचत असे. परदेशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना मराठी मातीत तयार झालेला अस्सल घरगुती चवीचा फराळ मिळाल्याचे समाधान वाटते. आजवर त्यांनी परदेशात पोह्चवलेल्या भारतीय पदार्थांची परदेशी लोक देखील खूपच स्थुती करताना पाहायला मिळतात.

अभिनेत्री किशोरी गोडबोले आणि पती सचिन गोडबोले यांची मुलगी “सई गोडबोले” हिने देखील आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सचिन आणि किशोरी गोडबोले यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत. नुकतीच दिवाळी स्पेशल ‘शॉपर्स टॉप’ ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या जाहिरातीत झळकणारी ती मुलगी सई गोडबोलेच आहे. सई गोडबोले दिसायला खूपच सुंदर आहे. २०१९ साली झालेल्या मिस इनबॉक्स हि स्पर्धा तिने जिंकली असल्याचं देखील बोललं जात. सईला वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याची आवड आहे शिवाय वडिलांना गोडबोले स्टोअर्स सांभाळण्यास देखील मदत करताना दिसते. याशिवाय सई परदेशी भाषांचा उच्चार देखील सराईतपणे म्हणते अनेकदा यासंदर्भातल्या तिच्या व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळते. तिने आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सई गोडबोले अभिनय क्षेत्रात नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. लवकरच ती मराठी चित्रपट किंवा मालिकेतूनही पाहायला मिळो हीच सदिच्छा…