Home News माझ्या बद्दल पुन्हा वाट्टेल बोललं जातंय.. मला चक्क शॉक ट्रीटमेंट आणि मानसिक...

माझ्या बद्दल पुन्हा वाट्टेल बोललं जातंय.. मला चक्क शॉक ट्रीटमेंट आणि मानसिक आजारांनी त्रस्थ असलक्याच बोललं जातंय

1828
0
actress ketaki chitale
actress ketaki chitale

अभिनेत्री केतकी चितळे हिने काही दिवसापूर्वी आपले व्हिडिओ शेअर करत epilepsy बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. त्या व्हिडिओजला अनेक ट्रॉलर्सनी ट्रोल देखील केलं ह्यात चक्क तिला असा कोणता आजार झालाय ज्यामुळे तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागतेय आणि मानसिक आजारांनी त्रस्थ असल्याचे देखील चर्चा झाली. नुकताच त्यावर स्पष्टीकरण देत अभिनेत्री केतकी चितळे हिने ह्यावर खुलासा करत पुन्हा एकदा व्हिडिओ अपलोड करत त्यावर आपले मत मांडले आहे. ती म्हणतेय epilepsy हा मानसिक आजार नाही गेली कित्तेक दिवस मी त्या संदर्भात जनजागृती करतेय.

actress ketaki chitale

epilepsy “अपस्मार” हा मानसिक आजार मुळीच नाही. मेंदूच्या कोशिकांतील विद्युत तरंग जरुरतीपेक्षा जास्त झाल्या किंवा अनियंत्रित झाल्या तर त्याला मिर्गी रोग (अपस्मार) म्हणतात. बेशुद्ध होणं, बेशुद्धीत कंपन होणं, तोंडावाटे फेस येणे अश्या अनेक समस्या आहेत. अनेक कारणांमुळे हा रोग होऊ शकतो. फिट येणे, आकडी येणं हा epilepsy चाच प्रकार आहे. ह्यावर योग्य उपचार घेतल्यानं हा नक्कीच बरा होऊ शकतो. गैरसमज दूर केल्यानं हा रोग नक्की काय आहे हे समजून घेतलं तर त्यावर इलाज कारण खूप सोपं आहे. जगभरात हा आजार अनेकांना आहे त्यात लपवण्यासारखं काही नाही ह्या उलट समोर येऊन लढलं तर इतरांनाही त्याबाबाद समजून लवकर इलाज होऊ शकतो. ज्या रुग्णांना औषधाचा फारसा उपयोग होत नाही अश्या लोकांना तंज्ञाकडून मेंदूत ट्रीटमेंट करून अपवादात्मक भाग शास्त्रकियेद्वारे बाजूला केला जातो त्यामुळे हा रोग पूर्णपणे बरा देखील होतो. पण ह्या रोगाची हवी तेवढी जनजागृती होत नाही उलट अश्या लोकांना बाजूला एकटं पाडलं जात. केतकी चितळे epilepsy warrior queen म्हणून त्याची जनजागृती करताना दिसते पण त्याचा उलट अर्थ काढत तिला ट्रोल केलं गेलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here