मराठी बिगबॉस सीजन ३ सुरु होऊन आता बरेच दिवस झाले ह्यात सहभागी झालेल्या कलाकारांना आता प्रेक्षक चांगलेच ओळखू लागले आहेत. बिगबॉसचे खेळ खेळताना आणि घरात ते कसे वागतात ह्यावरून आता कलाकार खऱ्या आयुष्यात आणि स्वभावाला कसे आहेत ह्याचा अनेकांना उलगडा झालेला दिसतो. खरतर पहिल्याच दिवसापासून बिगबॉसच घर चर्चेत आलं होत ते कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांच्यामुळे पण त्या घरातून बाहेर पडल्या असल्या तरी ह्या शो चा टीआरपी काही कमी झालेला दिसत नाही. अभिनेत्री स्नेहा वाघ हिने बिगबॉसच्या घरात येताना आपल्या दुसऱ्या पतीवर अनेक विधाने करत तिच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं होत.

अभिनेत्री स्नेहा वाघ हिचा दुसरा पती अनुराग सोळंकी आणि स्नेहा ह्यांचा विवाह फक्त वर्षभरच टिकला होता बिगबॉसच्या घरात येताना स्नेहाने अनुरागवर अनेक आरोप लावत तो छळ करत असल्याचं म्हटलं होत. यानंतर बिगबॉसच्या घरात देखील अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यापुढे तिने आपला पहिला पती अविष्कारच्या वर्तवणुकीबाबत बोलताना म्हणाली होती कि अविष्कार मला खूप मारायचा, खूप त्रास द्यायचा, माझ्या चेहऱ्यावर त्याने मारलेल्या माराचे वन मठायचे मी तशीच सेटवर जायचे सेटवरील लोकांना देखील आमच्यातील सर्वच समजलं होत त्यामुळे ते मला समजून घायचे पण रात्री शूटिंग संपून घरी जाताना मला खूपच भीती वाटायची माझ्या समोर आज काय वाढून ठेवलय अशी भीती वाटायची त्यांनी मला कितीही जवळ केलं तरी मी त्याला जवळ करणार नसल्याचं तिने म्हटलं होत. तिच्या ह्या बोलण्याने अनेकांनी तिची बाजू देखील मांडली होती. आता काही दिवसांपूर्वीच अभिनेता आणि स्नेहाचा पहिला पती अविष्कार दारव्हेकर याने एका मुलाखतीत स्नेहा आणि त्याच्या बद्दलच्या नात्याचा उलगडा केला आहे त्यात तो काय म्हणाल हे पाहुयात..

अभिनेता अविष्कार दारव्हेकर त्या मुलाखतीत म्हणाला कि ” आमच्या आयुष्यात जे झालं, माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर जे आरोप लावले गेले तेंव्हा आम्ही एवढंच ठरवलं होतं की त्यावर उत्तर द्यायचं नाही, माझी आई असं म्हणायची कि मुलींच्या विरुद्ध काही बोलायचं नाही, त्यामुळे समोर जे काही घडत होत ते फक्त बघायचं आणि हसायचं या सर्व स्टोरीज पाहून. परंतु या सर्व गोष्टींचा माझ्या करीअरवर खूप मोठा परिणाम झाला. मला माझ्या पहिल्या स्नेहा सोबतच्या लग्नाबद्दल काही वाईट वाटत नाहीये. स्नेहाने तीच करिअर केलं तिच्या स्वबळावर तिने यश मिळवलं यात तिनं माझं नाव पण नाही वापरलं तिने जे काही केलं ते तिच्या भरवश्यावर केलं मला नक्कीच या गोष्टीचा अभिमान आहे. आम्ही दोघं वेगळे झाल्यानंतर तिनं काहीच केलं नसतं तर मला त्रास झाला असता पण हो मीडियाला हे का नाही कळत की लग्नात दोघे असतात वेगळे झाल्यावर खूप एकटं पडल्यासारखं वाटलं मी याबाबत कुठं काहीच बोललो नाही हे पाहून आज मला खूप चांगलं वाटतंय. माझ्या आयुष्यात जे घडल ते लोकांसमोर आलंच आहे ह्यावर मी अजून काय प्रतिक्रिया द्यायला हवी होती. या सर्व गोष्टींमुळे लोकं आज मला सपोर्ट करत आहेत.