राजकुंद्रा ह्यांच प्रकरण रोज नव्या वळणावर येताना पाहायला मिळत आहे. मीडियाने हे प्रकरण चांगलंच उचलून धरलेलं पाहायला मिळतंय. ह्या प्रकरणात काही संबंध नसताना अभिनेता उमेश कामतला फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय चुकीचे फोटो दाखवलेल्या त्या मीडियाने त्याची कोणत्याही प्रकारची माफी देखील मागितली नसल्याचे समजते. हे प्रकरण मिटते न मिटते तोच आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या नावाचा उल्लेख आल्याने पुन्हा एकदा मराठी सृष्टीत वादळ निर्माण झाले आहे.

नुकत्याच एका प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री गहना वशिष्ठने खुलासा केला आहे कि राज कुंद्रा हा नवीन “बॉलीफिल्म” अॅप लाँच करण्याच्या तयारीत होता ह्यामध्ये तो चॅट शो सोबत रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ तसेच पिक्चर फिल्म्सचा समावेश करणार होता. ह्यामधील एका चित्रपटासाठी अभिनेत्री शमिता शेट्टी तर आणखीन एका फिल्म साठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा विचार केला गेला होता. राज कुंद्राला अटक होण्यापूर्वी ह्या विषयावर राज कुंद्रा आणि तिची चर्चा झाली होती. गहनाने ह्यापूवी देखील सोशिअल मीडियावर सांगितलं होत कि ह्या फिल्म्स मध्ये काहीच वाईट शूट केलं गेलं नाही तुम्ही ते व्हिडिओ आधी पहिले पाहिजेत. अश्या अनेक फिल्म्स आहेत ज्यामध्ये असे छोटेमोठे सीन घेतले जातात ज्यात अश्लील असं उघडपणे काही दाखवलं जात नाही. आम्ही असं कोणताही काम केलेलं नाही ज्यामुळे राज कुंद्रा ह्यांना जेल होऊ शकते. तिच्या ह्या मुलाखतीमुळे आता मराठी चित्रपट सृष्टीत आणखीन नवे वादळ निर्माण होणार हे नक्की. ह्या प्रकरणात आता आणखीन काय काय समोर येणार हे पुढील येणार काळच ठरवेल.