आई कुठे काय करते या मालिकेत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नुकतीच अरुंधती अनघाच्या घरी जाऊन तिच्या आई बाबांना अनघा आणि अभिच्या लग्नाबाबत बोलत असते. अनघाच्या आई वडिलांना अनघाची काळजी वाटत असते त्यावर अरुंधती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते अनघाचा पहिला नवरा तिला त्रास देतो हे पाहून त्याच्या विरुद्ध पोलीस तक्रार केलेली असते अभिशी बोलताना अरुंधती त्याला आता अधिक काळजी घेण्यासाठी सांगते. तर इकडे आप्पा आणि कांचन दिघेही आलेल्या परिस्थिमुळे हतबल झालेली पाहायला मिळतात. त्यांना देखील अरुंधती आधार देण्याचे काम करते.

मालिकेत अरुंधती ज्या आश्रमात काम करते तिथे नुकत्याच या आश्रमाच्या ट्रस्टीनी अचानक भेट दिलेली असते. या ट्रस्टीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “ईला भाटे”. मालिकेत ईला भाटे यांची म्हणजेच सुरेखाताईंची एन्ट्री झाल्याने आता आश्रमातील घोटाळ्यांचा हळूहळू उलगडा होणार आहे. आश्रमातील काही वस्तू तुम्ही गावी नेल्यात का असाही जाब त्या विचारताना दिसत आहेत त्यामुळे मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे कारण सुरेखाताई यांच्या येण्याने अरुंधतीला त्यांची मदत कशी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर अभिनेत्री ईला भाटे या आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहेत. ईला भाटे यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम भूमिका निभावल्या आहेत. नकुशी, अग्निहोत्र, झाले मोकळे आकाश, अपराधी, तुझे आहे तुजपाशी या आणि अशा कित्येक नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाची छाप पाडली आहे. ईला भाटे या अभिनेते आणि पत्रकार नंदा पातकर यांच्या कन्या आहेत.

ईला भाटे या शालेय शिक्षणात लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. चांगले गुण मिळवून डॉक्टर व्हायची त्यांची ईच्छा होती मात्र केवळ दोन गुण कमी असल्याने त्यांना प्रवेश मिळाला नाही. पण काहीतरी करायची जिद्द मात्र त्यांना होती आणि डीएमएलटीची पदवी मिळवून त्यांनी स्वतःची लॅब सुरू केली. शाळेत असताना नाटकांमधून त्या सहभागी होत असत त्यामुळे अभिनयाचीही आवड त्यांनी जोपासली होती. या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत कारवी लागे मग त्यांनी व्यवसाय सोडून संपूर्ण वेळ कलाक्षेत्राला देण्याचे ठरवले. व्यावसायिक नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून टाटांनी साकारलेल्या भूमिका उल्लेखनियच ठरल्या. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांचे पुनरागमन झालेले पाहून प्रेक्षकांनी देखील त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. आई कुठे काय करते या मालिकेत त्या आणखी एका तगड्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या मालीकेसाठी ईला भाटे यांना मनःपूर्वक शुभेच्छा…