Home Entertainment “मैत्री असावी तर अशी” विशालने केलं असं काही कि जिंकली सर्वांचीच मने

“मैत्री असावी तर अशी” विशालने केलं असं काही कि जिंकली सर्वांचीच मने

975
0
big boss marathi
big boss marathi

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात विशाल आणि जय हे दोन सदस्य कॅप्टन पदासाठी दावेदार ठरले आहेत. मात्र आपल्या आवडत्या सदस्याला कॅप्टन बनवण्यासाठी घरातील इतर सदस्यांना आपल्या जवळील काही खास आणि आवडत्या गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. मिराला ह्या टास्कमध्ये बिग बॉसने तिच्या जवळची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे सॉफ्ट टॉय तिला नष्ट करण्याचा आदेश बिग बॉसने दिला आहे. त्यामुळे ती बिग बॉसने दिलेले कार्य ती पूर्ण करणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे कारण ह्यानंतर मीरा रडताना देखील दिसली होती त्यामुळे ती कोणता निर्णय घेते हे लवकरच कळणार आहे. एकीकडे आपल्या जवळच्या वस्तू गमवाव्या लागत असल्याने अनेकांना रडू कोसळले असले तरी विकास आणि विशालच्या मैत्रीने मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत.

actor vishal and vikas
actor vishal and vikas

विशाल कॅप्टन बनावा ह्यासाठी विकासने त्याला पाठिंबा दर्शवला आहे. परंतु त्याला पाठिंबा देण्यासाठी विकसला डोक्यावरचे केस गमवावे लागणार आहेत. विकासने आपला पूर्ण पाठिंबा विशालच्या बाजूने दिला आहे त्यामुळे तो स्वतःच्या डोक्याचे केस हेअर ट्रीमरने कापतो. विकासने आपल्यासाठी टक्कल केले हे पाहून विशाल देखील भावुक झाला आणि त्यानंतर विशालने विकासकडचे ट्रीमर घेऊन स्वतःचे टक्कल केले. विशाल आणि विकास ची ही मैत्री पाहून अनेक जण आश्चर्यचकित झालेले पाहायला मिळत आहेत. मैत्रीसाठी डोक्यावरच्या केसांचा त्याग करणारे हे मित्र आता अनेकांची मने जिंकून घेत आहेत. ही दोस्ती तुटायची न्हाय… असेच या दोघांच्या मैत्रिकडे पाहून बोलले जात आहे. तर सोशल मीडियावर विकास आणि विशालच्या निर्णयाचे भरभरून कौतुक देखील केलं जात आहे. या दोघांच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये आणि भविष्यात त्यांनी एकमेकांची कायम साथ द्यावी असेच म्हटले जात आहे. या दोघांच्यातील मैत्रीचे हे नाते असेच अबाधित राहूदे आणि ती तितकेच अधिक घट्ट राहावे हीच एक सदिच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here