माझा होशील ना मालिकेतील सईची मैत्रीण नयनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला नुकताच एक वाईट अनुभव आला आहे. या अनुभवाबद्दल तिनं आपलं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. मालिकेत नयनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे मुग्धा पुराणिक. काल म्हणजेच ७ नोव्हेंबर रविवारी मुग्धा आपल्या मैत्रिणींसोबत कल्याण येथील मानस मंदिर जैन टेंम्पल येथे दर्शनासाठी गेली होती. मुळात मी जात धर्म पंथ याच्या विरोधात नाही हे सर्व समान आहे असं मी मानते त्यामुळे मी या जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते असे ती म्हणते. मंदिरात प्रवेश करताना तिथे ओढणी देण्यात आली होती ती त्यांनी डोक्यावर घेऊन आत लाईनमध्ये जाऊन उभ्या राहिल्या.

परंतु काही वेळाने तट समाजाची लोकं तिथं आली आणि त्यांनी मुग्धाला आतमध्ये जाण्यास मनाई केली. तुम्ही आत जाऊ शकत नाही असे म्हणताच मुग्धाने आम्ही का आत जाऊ शकत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्या लोकांकडून तुम्ही जैन धर्मीय नाहीत म्हणून आत जाऊ शकत नाही असे प्रतिउत्तर दिले. मुग्धाला ही गोष्ट खूप खटकली. कारण कुठल्याही हिंदू मंदिरात जाण्यासाठी कुठल्याही धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो तेही अगदी विनामूल्य काहीही पैसे न घेता त्यामुळे मुग्धाला जैन मंदिरात प्रवेश नाकारल्याने खेद व्यक्त केला आहे. आपल्या धर्मातील लोकं सगळ्यांना चांगली वागणूक देतात सर्वांना आपल्या कार्यात सामावून घेतात परंतु हा अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता. जैन धर्म मला खूप आवडतो आणि त्या धर्माचे विचार देखील मला आवडायचे मात्र या लोकांनी दिलेली वागणूक अत्यंत खेदजनक आहे. या गोष्टीची दखल घेतली जावी आणि याबाबत कुणीतरी आवाज उठवावा या हेतूने मी हा व्हिडीओ शेअर सोशिअल मीडियावर शेअर केला आहे असं ती म्हणते.

मुग्धा पुराणिक ही कल्याण येथे वास्तव्यास आहे. डी जी रुपारेल कॉलेजमध्ये असताना नाट्यसृष्टीशी ती जोडली गेली होती. यातूनच तिला अनेक नाटकांच्यामाध्यमातून विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. माझा होशील ना मालिकेत तिला नयनाची भूमिका मिळाली. थोडीशी अल्लड आणि नटखट नयना तिने आपल्या अभिनयाने सुरेख साकारलेली पाहायला मिळाली. या मालिकेमुळे मुग्धा पुराणिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. मंदिर प्रवेश नाकारल्याने मुग्धाने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. हिंदूंच्या कुठल्याही मंदिरात सर्वांना सहज प्रवेश घेता येतो त्यांना कुठल्या जातीचे आहेत धर्माचे आहात हे कधीच विचारले जात नाही मग जैन मंदिरात जाण्यासाठी हिंदूंना का अडवले जाते असा संतप्त सवाल आता उठवला जात आहे. तिचे चाहते देखील सोशिअल मीडियावर तिला ह्या गोष्टीसाठी सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत.