Home Entertainment महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांतला काळजात धडकी भरवणारा हा खलनायक आहे तरी...

महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांतला काळजात धडकी भरवणारा हा खलनायक आहे तरी कोण?

4060
0
actor bipin varti gidhad
actor bipin varti gidhad

चित्रपटांमध्ये नायकापेक्षा खलनायकाची भूमिका ही अतिशय कठीण असते असं अनेक जण म्हणतात. अशात दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आजवर या मराठी सिनेसृष्टीला अनेक दमदार खलनायक दिले आहेत. ज्यांचा अभिनय पाहून भल्या भल्यांना घाम फुटायचा. महेश कोठारे यांच्या चित्रपटात झळकलेले बिपिन वर्टी हे अशाच काही खलनायकांमधील एक होते. महादेश कोठारे यांचे चित्रपट सर्वपरिचित आहेतच पण त्यांच्या चित्रपटातील खतरनाक व्हिलन मात्र कोणी साकारले आहेत हे अनेकांना माहित नाहीत त्याबद्दल जाणून घेऊयात..

actor bipin varti
actor bipin varti

मराठी सिनेसृष्टीला बिपिन यांच्या अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा देखील वारसा लाभलेला आहे. अशात महेश कोठारे यांचा ‘माझा छकुला’ हा चित्रपट तर तुम्ही हमखास पहिला असेल. या चित्रपटात गिधाड हे खलनायकाच पात्र बिपिन यांनी साकारलं होतं. त्यावेळी चित्रपटातील त्यांचा लूक पाहून हा गिधाड नेमका कोण आहे? असा प्रश्न देखील अनेकांना पडला होता. तसेच ‘झपाटलेला’ या चित्रपटामध्ये पिळदार शरीरयष्टी असलेला कुबड्या खविस देखील बिपिन यांनी साकारला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘फेका फेकी’, ‘गंमत जंमत’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे. तसेच त्यांनी ‘फेका फेकी’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘डॉक्टर डॉक्टर’ अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

maza chakula gidhad bipin varti
maza chakula gidhad bipin varti

महेश कोठारे यांनी बिपिन यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, मधू कांबीकर, पूजा पवार, निवेदिता जोशी सराफ या कलाकारांबरोबर देखील अनेक चित्रपट केले आहेत. त्यांच्या बऱ्याचशा चित्रपटांत हेच कालाकार पाहायला मिळालेत.महेश कोठारे यांच्या सर्वच चित्रपटांमध्ये त्याच त्याच कलाकारांना कास्ट केलं जायचं.यावरुन या सर्व कलाकारांबरोबर बिपिन यांच्यासह असलेली महेश कोठारे यांची निखळ मैत्री समजते. अशात त्यांचे खलनायक देखील अगदी काळजात धडकी भरवणारे असायचे आणि त्यांची नावं देखील भयभीत करणारी असायची. बिपिन यांनी महेश कोठारे यांच्या चित्रपटात कुबड्या खाविस बरोबरच कवट्या महाकाळ ही खलनायकाची भूमिका देखील साकारली होती. सध्या बिपिन जरी आपल्यामध्ये नसले, तरी देखील त्यांच्या दमदार अभिनयाची छाप आजही अनेकांच्या मनात कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here