Home Movies तुफान चित्रपटातील ह्या खऱ्याखुऱ्या बॉक्सरची बायको आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

तुफान चित्रपटातील ह्या खऱ्याखुऱ्या बॉक्सरची बायको आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

5116
0
toofan film marathi actress husband
toofan film marathi actress husband

अनेक मराठी अभिनेत्री बॉलीवूड मध्ये झळकलेल्या तुम्ही पाहिलं असेल पण आता एका मराठी अभिनेत्रीचा पती बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री मानसी नाईक हिने मराठी सृष्टी गाजवली तर तिचा नवरा प्रदीप खरेरा लवकरच बॉलिवूड गाजवणार असल्याचे समोर आले आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात विवाहबद्ध झाले होते. हरयाणा येथील खरेरा कुटुंबाची सून बनून सध्या मानसी आपल्या सासरी मस्त मजेत राहत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरून ती नेहमीच सासरकडच्या मंडळींचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच शेअर करताना दिसते.

manasi naik with husband
manasi naik with husband

बघतोय रिक्षावाला… या गाण्यामुळे मानसी नाईकला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. नृत्यामुळे विशेष ओळख मिळालेल्या मानसी नाईक हिने सुरुवातीला मालिकांमधून काम केले होते. चार दिवस सासूचे या लोकप्रिय मालिकेत तिने प्रियंकाची भूमिका साकारली होती. जबरदस्त, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, मर्डर मेस्त्री अशा चित्रपटातून तिला अभिनयाची संधी मिळत गेली. सध्या मानसी कुठल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त नसली तरी तिचा नवरा प्रदीप खरेरा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज होत आहे. राकेश मेहरा दिग्दर्शित ” तुफान” या खेळावर आधारित चित्रपटातून प्रदीप खरेरा बॉक्सरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. खऱ्या आयुष्यात प्रदीप खरेरा हा प्रोफेशनल इंटरनॅशनल बॉक्सर आहे. WBC एशियन टायटल चॅम्पियन , रुबरु मिस्टर इंडिया २०१८ या स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. “तुफान” या आगामी चित्रपटात फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत झळकणार असून तो एका नॅशनल लेव्हलच्या बॉक्सरची भूमिका साकारणार आहे.

boxer pradeep kharera
boxer pradeep kharera

मृणाल ठाकूर, परेश रावल, ईशा तलवार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. बॉक्सिंगवर आधारित चित्रपट असल्याने प्रदीपला आपल्या रोजच्या मेहनतीव्यतिरिक्त कुठलेच जास्त काम करावे लागणार नाही खऱ्या आयुष्यात तो जी भूमिका जगतोय तीच भूमिका चित्रपटात साकारायची असल्याने प्रदीप आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्साही असलेला पाहायला मिळत आहे. चक्क बॉलिवूड चित्रपटामध्ये त्याला झळकण्याची एक नामी संधी मिळाली असल्याने त्याचे चाहतेही भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहेत. तुफान हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता मात्र १६ जुलै रोजी त्याचा प्रीमिअर ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित केला गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here