राज कुंद्रा प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे ह्या प्रकरणात राज कुंद्राची कसून चौकशी देखील करण्यात येतेय. नुकताच मीडियाच्या हाती सुगावा लागलाय त्यात कुंद्राने आणखीन काही कृत्य केल्याचे उघड झालेय. सोशिअल मीडियाने हे प्रकरण चांगलेच धारेवर धरलेलं पाहायला मिळतेय. ह्या प्रकरणात काही मिडीयानी कशाचीही शहानिशा न करता एका मराठी अभिनेत्याचे फोटो शेअर करत धक्कादायक बातम्या दाखवायला सुरवात केलीय. त्यात दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये चक्क मराठी अभिनेता “उमेश कामत” ह्याचे फोटो दाखवत आहेत. तर पाहुयात हे नक्की काय प्रकरण आहे..

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा सद्या तुरुंगात आहे त्याने काही महिन्यांपूर्वी केलेलं चॅटिंग आणि sms मीडियाच्या हाती मागले आहे. ह्या मध्ये उमेश कामत ह्या व्यक्तीचा उल्लेख आहे पण सोशिअल मीडियाने कशाचीही शहानिशा न करता मराठी अभिनेता उमेश कामत (नाव सारखं असल्यामुळे) ह्याचे फोटो टीव्हीवर दाखवायला सुरवात केलीय. हे पाहून अभिनेता उमेश कामत ह्याला ओळखणाऱ्या संपूर्ण मराठी फिल्म चाहत्यांची झोप उडाली आहे. अभिनेता उमेश कामात ह्याने नुकतीच आज एक पोस्ट शेअर करत ह्याबाबत खुलासा केला आहे तो म्हणतो ” आज राजकुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, ह्या प्रकरणातील एक आरोपी “उमेश कामत” ह्याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी ह्या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकरणामुळे माझी वयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक हानीसाठी या वृत्तवाहिन्यांना जबाबदार धरण्यात येईल. या प्रकरण संबधी मी योग्य ती कायदेशीर कारवाई नक्कीच करेन .. उमेश कामत” ह्या प्रकरणाशी कोणतीही शहानिशा न करता मीडियाने केलेल्या ह्या कृत्याचा मराठी चित्रपट सृष्टी नक्कीच समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.