ह्या महामारीच्या काळातही आपल्याला अनेक कलाकार लग्नाची गाठ बांधताना पाहायला मिळतात. पण एक मराठी अभिनेता ह्याला अपवाद म्हणावा लागेल त्याने चक्क त्याच्या लग्नाची तारीख पुढे ढकलून समाजसेवेचं काम हाती घेतलं आहे. त्याची होणारी पत्नी नर्स असून तीदेखील कोल्हापुरातील अर्थयु हॉस्पिटलमध्ये को’ विड सेंटरला रुग्णाची सेवा करते. दोघांनी विचार केला आज लग्न करून दोन जीव एकत्र येणार त्या पेक्ष्यादोघांनी जर आता रुग्णांची सेवा केली तर कित्येक लोकांचे प्राण वाचतील हेच ह्या दोघांसाठी सर्व काही जिंकण्यासारखं आहे.

ह्या अभिनेत्याचं नाव आहे “सिद्धेश प्रभाकर लिंगायत” आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे “महेश्वरी मधुसूधन लिंगायत”. सिद्धेशला यापूर्वी तुम्ही अनेक चित्रपटांत पाहिलं असेलच. “बारायन”, “प्रेमाचा कट्टा”, “बाजी”, “टाईम पास २”, “खारी बिस्किट”, “उनाड” यांसारख्या अनेक चित्रपटात तो झळकला आहे. इतकेच नाही तर “जागो मोहन प्यारे, लक्ष्य, ऐक नंबर, प्रेम हे, प्रिति परी तुझवरी, गाव गाता गझाली ह्या सारख्या मालिकात देखील त्याने भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून सिद्धेश ह्या महामारीच्या काळात लोकांची सेवा करताना पाहायला मिळाला. सिद्धेश कला क्षेत्रात मागील ८ वर्षे काम करतोय त्याने आयुष्यात खुप चढउतार पाहिलेत लोकसेवा हीच ईश्वर सेवा असे तो म्हणतो. सिद्धेश आणि महेश्वरी करत असलेले काम खरोखरच प्रेरणादायी आहे. सिद्धेश आणि महेश्वरी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..