अभिनय आणि व्यवसाय अशा दोन्ही क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या कलाकारांमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीने आपले नाव नोंदवलं आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “सुरभी भावे”. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अभिनय क्षेत्राशी निगडित असलेल्या सुरभी भावे यांनी आजवर अनेक मालिका आणि व्यावसायिक नाटकातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच सुरभी भावे यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून “सुरभी सारीज् ” या नावाने साड्यांचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. व्यवसायाची घोषणा करताच सुरभी भावे यांच्यावर मराठी सृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेतून सुरभी भावेचे मराठी मालिका सृष्टीत पदार्पण झाले होते. सणांच्या ग माहेरी या नृत्य नाटिकेतून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. लेकुरे उदंड झाली, आई तुला कुठे ठेऊ या गाजलेल्या नाटकांतून अभिनयाची संधी मिळत गेली. अस्मिता, तू माझा सांगाती, माझे पती सौभाग्यवती, चित्रकथी, गं सहाजनी , सख्या रे, गोठ, स्वामीनी, तुला पाहते रे, गोठ, चंद्र आहे साक्षीला, मोलकरीणबाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशा एका पाठोपाठ एक मालिकेतून विविधांगी भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. मालिका नाटक असा प्रवास सुरु असताना ‘पावनखिंड’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळणार आहे. दिगपाल लांजेकर यांच्या जंगजौहर या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले त्या चित्रपटाला आता पावनखिंड या नावाने ओळखले जाऊ लागले. हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज होणार होता मात्र सद्य परिस्थितीमुळे आणि थेटर बंद असल्या कारणाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

अर्थात सुरभी भावे यांनी या चित्रपटात अभिनय साकारला असल्याने या चित्रपटाबाबत त्या खूपच उत्साही आहेत. आलेल्या भूमिका छोट्या असो किंवा मोठ्या त्याची लांबी रुंदी न पाहता आपली भूमिका प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर कशी मांडता येईल याचा विचार त्यांनी केला त्याचमुळे त्यांच्या स्वामीनी मालिकेतील ठसकेबाज ‘भामिनी’ या भूमिकेला पुरेसा वाव मिळाला. अभिनय साकारत असताना व्यवसाय क्षेत्रातही उतरण्याचा निर्णय घेणाऱ्या सुरभी भावे यांचे साडी कलेक्शन त्यांच्या सोशल अकाउंटवर पाहायला मिळेल. वेगवेगळ्या रंगाच्या, रंगीबेरंगीत हटके डिझाईन असलेल्या साड्या तुम्हाला त्यांच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतील. महिलांनी त्यांचं कलेक्शन पाहताच त्या घेण्याचा मोह महिलांना होताना पाहायला मिळतो तीच त्यांची जमेची माजू आहे. या नव्या व्यवसायानिमित्त अभिनेत्री सुरभी भावे याना मनःपूर्वक शुभेच्छा!!!