आई माझी काळूबाई मालिकेच्या अडचणी नेहमीच समोर येताना दिसत आहेत. सुरुवातीला या मालिकेत आर्याची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सांभाळली होती परंतु मालिकेच्या सर्वेसर्वा असलेल्या अभिनेत्री अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वादामुळे प्रजक्ताने यापुढे ही मालिका करत नसल्याचे सांगितले होते. प्रजक्ताने मी काम करूनही माझ्या कामाचे पैसे दिले नसल्याचा आरोप अलका कुबल यांच्यावर लावला होता याशिवाय मालिकेचा नायक माझ्याशी नेहमीच गैरवर्तन करत असल्याचे कारणही तिने मिडियाशी बोलताना सांगितले होते. असे असूनही अलका कुबल यांनी माझी साथ न देता नायकाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असे प्राजक्ताचे म्हणणे होते. यासर्व कारणास्तव प्रजक्ताने मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.
प्राजक्ता नंतर आर्याची भूमिका अभिनेत्री वीणा जगताप हिच्याकडे आली. आर्याच्या भूमिकेत विणाला प्रेक्षकांनी स्वीकारले काही काळ ही मालिका विणाने आपल्या अभिनयाने चांगलीच रंगवली देखील परंतु आता वीणा जगताप देखील ही मालिका करणार नसल्याचे सांगितले जात आहे. मध्यंतरी वीणा आणि बिग बॉस विजेता शिव ठाकरे यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या याच कारणास्तव वीणा मालिकेतून एक्झिट तर घेत नाही ना अशी चर्चा पाहायला मिळते आहे. कारण लवकरच स्पष्ट होईल परंतु आता आई माझी काळूबाई या मालिकेत आर्याची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न प्रेक्षकांसमोर उभा राहिला आहे. या प्रश्नाचेही उत्तर मिळाले असून आता ही भूमिका अभिनेत्री “रश्मी अनपट” साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रश्मी आता आई माझी काळूबाई मालिकेत आर्याच्या भूमिकेसाठी सज्ज झाली असून या भूमिकेबाबत ती फारच उत्सुक असलेली दिसून येते. प्राजक्ता आणि वीणा नंतर आर्याची भूमिका रश्मी कडे आल्याने ही भूमिका ती कशी निभावते याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रश्मी ने आजवर अनेक मालिकांच्या माध्यमातून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे ही भूमिका देखील ती तितक्याच ताकदीने उभारेल अशी आशा व्यक्त होत आहे. या भूमिकेसाठी रश्मी अनपट हिला खूप खूप शुभेच्छा…