घेतला वसा टाकू नको या मालिकेतून आपल्याला भारतीय सण आणि त्याची परंपरा का व कशामुळे जोपासली जाते याचा उलगडा केलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्यामागच्या कथा टीव्ही माध्यमातून पाहायला मिळत असल्याने झी वाहीनीच्या प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळते. नुकतेच होळी सणाच्या निमित्ताने होळी का साजरी केली जाते व त्यामागची पौराणिक कथा काय आहे याबाबत उलगडा केलेला दिसून आला. सतत देवाचे नामस्मरण करणारा भक्त प्रल्हाद होलिका राक्षसीनीचे दहन कसे करतो याची कथा आता घेतला वसा टाकू नको या मालिकेतून पाहायला मिळत आहे.
या मालिकेला बरेचसे नवखे कलाकार लाभले आहेत तर काहींनी याअगोदर मालिकेतून काम केली असल्याने प्रेक्षकांच्या ती परिचयाची बनली आहेत. आज या मसलिकेत भगवान विष्णूच्या भूमिकेत दिसणाऱ्या कलाकाराबद्दल जाणून घेऊयात…ही भूमिका साकारली आहे अभिनेता “निखिल झोपे” या कलाकाराने. निखिल झोपे याला तुम्ही ओळखले असेल अग्गबाई सासूबाई या मालिकेतून त्याने बबड्याच्या मित्राची भूमिका साकारली होती. बबड्याला आणखी बिघडवण्यास कारणीभूत ठरलेला निखिल या मालिकेतून विरोधी भूमिकेत पाहायला मिळाला होता. ‘अणुकाया’, ‘आब्रो’ शॉर्टफिल्म, झी युवा वरील ‘फुलपाखरू’, ‘ये रे ये रे १५ या मालिका, ‘उर्वशी’, ‘जाणता राजा’, छत्रसाल बुंदेला’ हे नाटक अशा नाटक तसेच शॉर्टफिल्म आणि मालिकांच्या माध्यमातून निखिलने विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत. यातून बहुतेकदा त्याच्या वाट्याला ऐतिहासिक भूमिका आलेल्या दिसतात. याशिवाय सुरुवातीच्या काळात त्याने काही ब्रँडसाठी मॉडेलिंगचे काम केले आहे आणि काही व्यावसायिक जाहिराती साकारल्या आहेत. घेतला वसा टाकू नको या मालिकेतून तो भगवान विष्णूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर अभिनेत्री श्वेता खरात हिने लक्ष्मीमातेची भूमिका साकारली आहे.