स्टार प्रवाह वाहिनीवर “वैजू नं १” हि मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेने प्ररक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात राहीले आहेत. या मालिकेत अभिनेता मिहीर राजदा आणि त्याची पत्नी अभिनेत्री नीलम पांचाळ यांनी एकत्रित गुजराथी जोडप्याची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यात पती पत्नी असलेले हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच मराठी मालिकेत एकत्रित झळकले होते. मिहिरची पत्नी नीलम पांचाळ हीने गुजराथी चित्रपट, हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. वैजू नं १ या मराठी मालिकेमुळे तिला प्रथमच मराठी सृष्टीत अभिनयाची संधी मिळाली होती. सध्या नीलम मोठ्या संकटात सापडली आहे. एक भावनिक पोस्ट शेअर करून तिने चाहत्यांना माझ्यासाठी प्रार्थना करा असे म्हटले आहे.

या भावनिक पोस्ट सोबत निलमने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिने आपल्या संपूर्ण शरीरावर असे फोड आल्याचे म्हटले आहे. ” हे काय आहे मला माहित नाही…पण हे बहुतेक फूड ऍलर्जी असावी किंवा आणखी काही. हे खूपच वाईट दिसत आहे. मी सध्या एका छोट्याशा शहरात शूटिंगसाठी आले आहे जिथे या आजारावर मला औषधं मिळणे कठीण आहे. काही वेळापूर्वीच मी औषधं घेतली आहेत आशा आहे की ती काम करतीलही…परंतु तरीदेखील तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा कारण हे सर्व माझ्या शरीरभर पसरले आहेत आणि ते असह्य आहे तुमच्या प्रार्थनेने काही जादू नक्कीच घडेल. अशी भावनिक पोस्ट निलमने काही वेळापूर्वी शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना देखील केली आहे. मिहीर सध्या सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मिहिरने आनंद ची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे मिहीर राजदा हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. मिहीर काही मालिकांचे लेखन देखील करतो आहे अभिनयासोबतच तो लेखक म्हणूनही ओळखला जातो. मिहिरची पत्नी नीलम या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडो हीच एक सदिच्छा…