काही दिवसांपूर्वी मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी” हिने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होत. दिपश्री माळी ही मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री असून गर्ल्स हॉस्टेल, एक घर मंतरलेलं अश्या काही मालिका आणि अनेक मराठी नाटकांत तिने काम केले आहे. साधारण चार वर्षांपूर्वी दिपश्रीने अमेय माळीसोबत लग्न केले होते. आपला संसार सांभाळत मधल्या काळात तिने अभिनयाची आवड जोपासावी म्हणून मालिकांमध्ये काम केले होते.

आपल्या चाहत्यांना तिने नुकतीच खुशखबर देत एक छोटीशी पोस्ट लिहली आहे ती म्हणते “एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत नवीन विश्व नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं आणि शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा निशब्द करणारा एकच शब्द “आई ” काल आमच्या घरी लक्ष्मी आली, मुलगी झाली हो.” तिच्या ह्या पोस्टवर अनेक कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय. आई होण्यासारखं सुख या जगात दुसरं काही नाही पण हे सगळं सांभाळून पुढे देखील ती अभिनयक्षेत्रात काम करत राहील अशी आशा आहे. दिपश्री सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. दरवेळी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन पोस्ट, आठवणी शेअर करत असते. अभिनेत्री दिपश्रीला तिच्या आयुष्याच्या या गोड प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…