ठिपक्यांची रांगोळी हि मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांची आवडीची मालिका ठरलेली पाहायला मिळते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत शशांक आणि अपूर्वा यांची लव्हस्टोरीं पाहायला मिळतेय. मालिकेत सगळेच मोठे मोठे कलाकार पाहायला मिळतायेत यात सध्या तरी अपूर्वा आणि शशांक यांच्या लग्नाची जुळवाजुळव पाहायला मिळतेय या मालिकेत शशांक हा समजूतदार आणि अपूर्वा हि बिनधास्त आपल्या मनाप्रमाणे वागणारी दाखवली आहे. आता हे लग्न कधी करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. ठिपक्यांची रांगोळी यात चेतन वडनेरे आणि ज्ञानदा रामतीर्थकर हे मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळतात कमी कालावधीतच हि मालिका प्रेक्षकांना आवडू लागली आहे.

सोबतच मंगेश कदम ,सुप्रिया पाठारे ,शरद पोंक्षे ,अतुल तोडणकर, लीना भागवत, सारिका निलाटकर, शीतल कुलकर्णी ,स्वप्नील काळे ,अमृता फडके ,श्रीकांत भिडे हे प्रसिद्ध कलाकार या मालिकेत पाहायला मिळतात सध्या मालिकेत अपूर्वाने केलेली मदत कानिटकर कुटुंबाला संकटातून बाहेर काढताना दिसली आहे त्यामुळे अपूर्वा आणि शशांक या दोघांचे लग्न जुळवण्यासाठी प्रयन्त करताना पाहायला मिळणार आहेत या मालिकेतील एका कलाकाराचे खऱ्या आयुष्यात नुकतेच लग्न झाले आहे अमेय कानिटकर व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता स्वप्नील काळे नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. स्वप्नील काळे हा मराठी मालिका ,चित्रपट तसेच नाट्य अभिनेता आहे त्याने बी टेकची पदवी मिळवल्यानंतर स्वप्नीलने नाट्य स्पर्धा ,एकांकिका साकारत असताना त्याला नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली ‘काय झालं कळना या चित्रपटात अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि स्वप्नील काळे मुख्य भूमिकेत झळकले होते आम्ही बेफिकर ,छावणी हे चित्रपट त्याने अभिनित केले आहेत अस्सं सासर सुरेख बाई ,वर्तुळ या मालितेतून तो प्रेक्षकांसमोर आला होता अभिनेता स्वप्नील काळे मृदुला कुलकर्णी सोबत विवाह बंधनात अडकला आहे.

त्याची पत्नी मृदुला कुलकर्णी हि देखील अभिनेत्री आहे सध्या सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या मालिकेत ती महत्वाची भूमिका साकारत आहे राजाला जावई हवा ,क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची प्रेम करावं पण जपून ,यदाकदाचित ,नवे लक्ष्य ,सोन्याची पावलं आम्ही पाचपुते अश्या टीव्ही व नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली पाहायला मिळाली त्यांच्या लग्नाला ठिपक्यांची रांगोळी मधील कलाकार उपस्थित होते सुप्रिया पाठारे ,शितल कुलकर्णीह्या कलाकारांनी उपस्तिथ राहून शुभेच्या दिल्या.