मागच्या महिन्यात अभिनेत्री स्मिता तांबे हिने एका गोड़ मुलीला जन्म दिल्याची बातमी तुम्ही ऐकलीच असेल. अभिनेत्री खुशबू तावडे- साळवी ही देखील कुणी तरी येणार येणार गं म्हणत बेबी शॉवरचे फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळाले होते. महिलांच्या आयुष्यातील सर्वांत गोड़ क्षण आई बनण्याचा असतो त्यामुळे फक्त अभिनेत्रीच नाही तर अनेक महिला देखील ह्या क्षणाचा आनंद घेताना पाहायला मिळतात. फरक फक्त इतकाच असतो कि काही महिला तो क्षण सोशिअल मीडियावर सर्वांसोबत शेअर करतात तर काही महिला त्या आठवणी मनात साठवून ठेवतात. आता आणखीन एका मराठी अभिनेत्यांची जोडी आई आणि बाबा बनणार आहे.

नुकतंच फोटो शेअर करत अभिनेत्री रुची सवर्ण हिने लवकरच आई बनणार असल्याची गोड़ बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मराठी अभिनेता अंकित मोहन हा अभिनेत्री रुची सवर्ण हीच पती आहे. दोघांनीही “फत्तेशीकस्त” या ऐतिहासिक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. अंकित मोहन याने फत्तेशीकस्त या चित्रपटाव्यतिरिक्त ‘फर्जंद’, ‘एक थी बेगम’, ‘महाभारत’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘हैवान’, ‘ कुमकूम भाग्य’ या मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. अंकितची पत्नी रुची सवर्ण ही देखील हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहे. ‘ सख्या रे’ या मराठी मालिकेतून तिने प्रियंवदा ची भूमिका साकारली होती. प्यार का बंधन, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, घर आजा परदेसी अशा हिंदी मालिका तिने अभिनित केल्या आहेत. कुमकुम भाग्य सारख्या आणखी काही हिंदी मालिकेतून हे दोघेही एकत्रित झळकले होते. २०१५ साली रुची आणि अंकित मोहन विवाहबद्ध झाले होते. मालिका करतानाच दोघांची ओळख झाली होती आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केलं. लग्नानंतरही दोघांनी मराठी आणि हिंदी मालिका आणि चित्रपटांतून कामे करत प्रेक्षकांची मने जिंकली.

अंकित मोहन त्याच्या शरीर यष्टीमुळे मराठी चित्रपटातला बाहुबली अशीही ओळख त्याला मिळाली आहे. पती आणि पत्नीच्या ह्या जोडीचे व्यायाम करतानाचे असंख्य व्हिडिओ तुम्हाला त्यांच्या सोशिअल अकाउंटवर पाहायला मिळतील. आपल्या शरीराकडे लक्ष देताना काही टिप्स देखील ते चाहत्यांशी शेअर करताना पाहायला मिळतात. अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण ह्यांनी गणपतीच्या दिवसांत बेबी शॉवरचे फोटो शेअर करून आई बनणार असल्याची ही आनंदाची बातमी कळवली होती. आमच्या आयुष्यातील हा सुवर्ण क्षण आम्ही अनुभवत असल्याचं तिने म्हटलं होत. आता हि फोटो शेअर करत तिने पती अंकित मोहन ह्याचे आभार मानले आहेत तिची मला नेहमी साथ मिळते त्यामुळे मला सर्व काही खूप सोपं जात अशीच साथ असुदे असं देखील तिने म्हटलेले पाहायला मिळत. अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेत्री रुची सवर्ण ह्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…