भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प. पु. डॉ. बाबासाहेब यांची आभाळा एवढी कीर्ती जगभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या महामानवाची जयंती संपूर्ण जगात अगदी धूमधडाक्यात साजरी केली जाते. अशातच अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरातील रस्त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून समस्त भीम अनुयायांच्या आनंदात आणखीन भर पडली आहे. शोषित, वंचितांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारे आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ‘६१ स्ट्रीट ब्रॉडवे’ या रस्त्याचे नामकरण ‘डॉ.बी.आर आंबेडकर’ असं करण्यात आलं आहे. जगातील तमाम व्यक्तींसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे. दरम्यान नामकरण करतानाचे तसेच, तेथील व्यक्तींचे गळ्यामध्ये जय भीम नावाचे निळे शेले घातलेले फोटोज प्रचंड वायरल होत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अथक परिश्रम घेतले असून, देशाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. जातीयतेच्या गुलामगिरीतून दलितांना मुक्त करणाऱ्या या महामानवाचे पुतळे अनेक शहरांमध्ये पाहायला मिळतात. अशातच भारतातील तसेच जगभरातील प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकर कळावे म्हणून ‘गणेश रसाने’ यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली. या मालिकेमध्ये बाबासाहेबांच्या लहानपणापासून ते राज्यघटनेचे शिल्पकार होईपर्यंतचा प्रवास दाखवला गेला आहे. सोबतच या मालिकेमध्ये त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील दाखवल गेलं आहे.