Home Entertainment कॉलेजमध्ये मुलांमुलींसमोर ह्या मुलाने साडी नेसून केलं लावणीवर अप्रतिम नृत्य

कॉलेजमध्ये मुलांमुलींसमोर ह्या मुलाने साडी नेसून केलं लावणीवर अप्रतिम नृत्य

1325
0
swapnil vidhate lavni
swapnil vidhate lavni

ह्यापूर्वीही तुम्ही अनेक मुलांना लावणी वर डान्स करताना पाहिलं असेल पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका मुलाबद्दल सांगणार आहोत ज्यांनी लावणी सादर करून अनेक बक्षिसे मिळवली आहेत . ह्या मुलाचं नाव आहे “स्वप्नील विधाते”. स्वप्नील हा अमरावती जिल्ह्यातील बेलोरा या छोट्याश्या गावातला, लहानपणापासूनच शाळेत गॅदरींगमध्ये डान्स करण्याची आवड, पुढे ती कला गणेश उत्सव आणि नवरात्रीतही दाखवू लागला. लहानपणापासूनच त्याच नृत्य इतकं सुंदर होत कि पाहणारी मंडळी त्याच्यावर खुश होऊन १०,२० रुपये बक्षीस म्हणून द्यायची. पण वडील पहिलवान त्यामुळे ह्या कलेला घरातून पाठिंबा नव्हता शिवाय घरा शेजारील लोक नाव ठेवायचे. शेवटी वडिलांनी त्याला घरातून हगकलून दिल.

dancer swapnil vidhate
dancer swapnil vidhate

स्वप्नीलने एमबीए केलय शिवाय बीएससी हॉटल मॅनेजमेंट देखील केलय पण त्याच्या नृत्याची आवड काही जाईना म्हणून वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं. पुढे तो अमरावतीत एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नोकरी करू लागला. पण तेथील लोकांनी तू एक उत्तम डान्सर आहेस आणि तू हि कला जपायला पाहिज असं प्रोत्साहन दिल. त्यांच्या आग्रहाखातीर तो पुन्हा नृत्याकडे वळला. स्वप्नील हा खूपच सुंदर लावणी सादर करतो. अनेक ठिकाणी तो शो करतो. डान्स महाराष्ट्र डान्स ह्या शो मध्ये देखील तो झळकला होता. नुकतच स्वप्नीलला दिल्लीच केटिके फौंडेशन तर्फे त्याला “भारत गौरव” ह्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलय. ढोलकीवर थाप पडली कि त्याचे पाय थिरकायला सुरवात होते. मुलगा असूनही एका उत्तम नृत्यांगनेला देखील तो मागे पाडेल असच त्याच नृत्य. अनेक बक्षिसे मिळाल्याने त्याचा झालेला सन्मान पाहून आता त्याच्या आई वडिलांना त्याचा हेवा वाटतो. वडील पहिलवान आणि मुलगा साडी घालून डान्स करतो असे हिणवणारे लोक देखील आता त्याच कौतुक करताना पाहायला मिळतात. त्यामुळे मित्रानो तुम्हाला जे जमतंय त्यात पारंगत व्हा “दुनिया झुकती हे झुकाने वाला चाहिये…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here