माझी तुझी रेशीमगाठ मालिका सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सर्वच कलाकार उत्तम अभिनय करताना पाहायला मिळत आहेत. यामुळेच काल झालेल्या अवॉर्ड सोहळ्यात देखील याच मालिकेतील कलाकारांना सर्वात जास्त बक्षिसे देखील मिळाली. प्रार्थना बेहरे, श्रेयश तळपदे, मोहन जोशी, संकर्षण कऱ्हाडे यांसारखी तगडी स्टारकास्ट या मालिकेला लाभली आहे. मालिकेतील छोटी परी असो किंवा सिम्मी साकारणारी अभिनेत्री सर्वानीच मालिकेसाठी विशेष मेहनत घेतलेली पाहायला मिळते. सिम्मी तिच्या मुंबई ऑफिस मध्ये कामकाजात अफरातफरी करते आणि तिला साथ देणारा अधिकारी घरतोंडे यांनी देखील उत्तम अभिनय साकारला आहे. ह्या अभिनेत्याला पाहून तुम्हाला त्याचा चेहरा नक्कीच ओळखीचा वाटला असेल पण तो नक्की आहे तरी कोण ते जाणून घेऊयात …

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत घरतोंडेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे दिनेश कानडे. दिनेश कानडे याना तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत देखील पाहिलं असेलच. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी राहुजी सोमनाथ हे पात्र साकारलं होत. अभिनेते दिनेश कानडे हे अभिनय साकारत बाहेर काम देखील करताना पाहायला मिळतात. आजही दिनेश कानडे हे बेस्ट मध्ये कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून त्यांनी कला क्षेत्रात देखील आपलं नाव कमावलं आहे. बेस्ट तर्फे उत्तम कलाकार म्हणून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत सिम्मी यांच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये कामात नेहमी अफरातफरी करताना त्यांना पाहिलं जात. आणि त्याच्या चुका जेव्हा दुसऱ्यांच्या लक्षात येतात तेंव्हा ज्या स्टाईलने ते रुमाल घेऊन डोक्यावरील घाम पुसतात तो सिन पाहून अनेकांना हसू आवरत नाही. सिम्मी च्या ताटाखालचं मांजर आणि तितकाच भित्रा व्यक्ती असं हे पात्र आहे. खरतर हि विरोधी भूमिका असली तरी ती जरा हटके स्टाईलने दाखवल्यामुळे त्यातून कॉमेडी देखील पाहायला मिळते.असो माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला आणि अभिनेता दिनेश कानडे याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…