विनोदी कलाकार म्हटलं तर पुरुष मंडळींना प्रथम प्राधान्य दिल जात. पूर्वीपासून विनोद करताना महिलांच्या जागी पुरुषच साडी नेसून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळायचे. आज देखील बऱ्याच कार्यक्रमांत महिलांच्या जागी अभिनेतच साड्या नेसुन कॉमेडी करताना पाहायला मिळतात. पण हि प्रथा काही मराठी अभिनेत्रींनी मोडीत काढली अभिनेत्री निर्मिती सावंत ह्यांनी अनेक नाटके आणि मालिकांतून आपला ठसा उमठवला त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने देखील मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या शो मधून विशाखाने प्रेक्षकांची मने जिंकली.

पण इथवर येण्यासाठी तिने अपार मेहनत घेतली आहे. अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर ती दारोदार जाऊन मार्केटिंचे काम करत होती पण महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमुळे विशाखाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. इथूनच तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळत गेली. मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, अरे आवाज कोणाचा, झपाटलेला २, सासूच स्वयंवर, दगडाबाईची चाळ, ये रे ये रे पैसा या सर्व चित्रपटांत तिची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात असेल. प्रत्येक चित्रपटात छोटासा रोल जरी असला तरी तिच्या अभिनयाने तो सिन तिने उत्तम साकारला. त्यामुळेच चित्रपटातच नाव जरी आठवलं तरी त्या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. अभिनयासोबतच विशाखा उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. बहुतेक शोमधून विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळते. दोघांचं टायमिंग आणि हावभाव ह्यामुळे त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना भावते. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल कि अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा पती देखील मराठी अभिनेता आहे.

अभिनेत्री विशाखा सुभेदार ह्यांचा पती नक्की आहे तरी कोण असा सवाल तुम्हाला नक्कीच पडला असेल. १ जून १९९८ साली विशाखाने अभिनेते महेश सुभेदार यांच्याशी विवाह केला. महेश सुभेदार हे मराठी नाट्य तसेच चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात. मराठीच नाही तर हिंदी मालिकांत देखील त्यांनी कामे केलेली आहेत. तक्षक याग, लगी तो छगी, बेधुंद, अशी ही भाऊबीज, ही पोरगी कोणाची या आणि अशा मोजक्या नाटक आणि चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला आहे. अभिनेते महेश सुभेदार आणि पत्नी अभिनेत्री विशाखा सुभेदार याना “अभिनय” हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मुलगा अभिनय ह्याला देखील अभिनयाची विशेष आवड दिसते. विशाखा सुभेदार यांचे कुटुंब अंबरनाथ येथे स्थायिक आहे परंतु नाटक सिनेमे आणि मालिका यांसाठी पुण्या मुंबईला बहुतेकवेळा त्यांना राहावे लागते. या सुभेदार कुटुंबाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा…