बॉलीवूड चित्रपटांत अनेक कॉमेडी चित्रपट आले आणि गेले असे खूपच कमी चित्रपट आहेत जे आजही पाहिल्यावर खूप हसू येत. त्यातला हेराफेरी हा चित्रपट खूपच गाजला होता. अक्षय कुमार, परेश रावल, सुनिल शेट्टी यांनी त्या चित्रपटात रंग भरला. २००० साली या चित्रपटने बॉक्स ऑफसवर धुमाकूळ घातला इतकंच नाही तर हा चित्रपट आजही लोक टीव्हीवर पाहून पसंत करतात. यामुळेच ह्या चित्रपटाचा २००६ साली पार्ट २ देखील बनला त्याच नाव होत ‘फिर हेरा फेरी’. फिर हेरा फेरी हा चित्रपट देखील तुफान गाजला. या चित्रपटात एक उंच माणूस दाखवला होता आज आपण त्याच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात एक काळ्या कपड्यातील उंच माणूस दाखवला होता. संपूर्ण चित्रपटात त्या माणसाचा चेहरा दाखवला गेला नव्हता. चित्रपटात तिवारी सेठच्या गँगमध्ये काम करणारा तो उंच माणूस लोकांकडून पैसे वसुलीचे काम करायचा पण हा माणूस नक्की आहे तरी कोण असा अनेकांना सवाल पडला होता. ह्या उंच माणसाचं नाव आहे ‘जगदीप सिंह’ असे आहे. पंजाब पोलीस मध्ये तो हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासूनच त्याला असिटिंग ची आवड आहे. युट्यूबवर तुम्हाला त्याचे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळतील. त्याची प्रसिद्धी पाहता त्याला अनेक पंजाबी चित्रपटात काम करायची संधी मिळते. बॉलीवूड मध्ये देखील त्याने फिर हेरा फेरी, रंग दे बसंती, तीन थे भाई आणि वेलकम न्यूयॉर्क अश्या चित्रपटांत छोटीमोठी कामे केली आहेत. त्याची उंची ७ फूट ६ इंच आणि वजन १८० किलो असल्याने त्याला पाहताच समोरच्याच्या मनात धडकी भरते. पण त्याच्या ह्या उंची आणि वजनामुळे त्याला खूप गोष्टींचा सामना देखील करावा लागतो. खुर्चीवर बस्तान देखील त्याला आधी खुर्चीची तपासणी करावी लागते वजन जास्त असल्याने त्याच्या वजनाने अनेक खुर्च्या तुटल्या असल्याचे तो हसून सांगतो.

रोज नित्यनियमाने तो ३ किलोमीटर जॉगिंग करतो. मधल्या काळात व्यायाम न केल्याने त्याला सांधेदुखीचा फारच त्रास जाणवला होता. डॉक्टरांच्या सल्याने योग्य ट्रीटमेंट घेऊन तो आता नियमित व्यायाम करताना पाहायला मिळतो. त्याचा टाळावा इतका मोठा आहे कि त्याला १९ नंबरच बूट लागतो जो त्याला अमेरिकेतून मागवावा लागतो. आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला खूप मेहनत आणि पैसे देखील खर्च करावा लागतो. बरीच वर्ष त्याला लग्नासाठी कोणी मुलगी देखील देत नव्हतं सगळ्या मुली त्याच्या समोर खूपच छोट्या दिसायच्या. पण नंतर सुखबीर कौर या मुलीशी त्याच लग्न झालं. सुखबीर कौर हिची हाईट देखील ५ फूट ११ इंच आहे. जगदीप सिंह आणि सुखबीर कौर याना दोन मुले देखील आहेत. एक मुलगा ११ वर्षाचा आणि दुसरा ९ वर्षाचा आहे ते दोघेही आपल्या वडिलांप्रमाणेच उंच आहेत. त्यांना देखील वर्गातील मुलांसोबत मिळून मिसळून राहण्यास अडचणी येतात असं तो म्हणतो. असो जास्त उंची असल्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. जगदीप सिंहला अभिनय क्षेत्रात आणखीन प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा…