Home Entertainment स्वीटूला सत्य समजलं पण मालिकेत अजून खूप काही बाकी आहे ओम आता...

स्वीटूला सत्य समजलं पण मालिकेत अजून खूप काही बाकी आहे ओम आता पाहायला मिळणार बॅड बॉयच्या रूपात

4179
0
om and sweetu yeu kashi tashi mi nandayla
om and sweetu yeu kashi tashi mi nandayla

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटू आणि ओम ह्यांच्या लग्नात स्वीटूच्या बाबाना वाचवण्यासाठी ओम लग्नमंडपातून निघून जातो मग इकडे नवरा मुलगा पळून गेला म्हणून स्वीटू आणि मोहीतच लग्न होत. हा सगळं प्रकार प्रेक्षकांना मुळीच आवडला नव्हता. खरंतर मालिकेला प्रेक्षकांची पसंती होती पण ह्या एका सीनमुळे सगळं काही बिघडलं आणि प्रेक्षणी मालिकेला आणि कलाकारांना ट्रॉल करायला सुरवात केली. बऱ्याच दिवसांपासून मालिकेत स्वीटू आणि ओम ह्यांना एकत्र काम करताना दाखवलं पण ओम लग्नमंडपातून बाहेर का गेला हे मात्र दाखवलं नव्हतं.

actor shalv kinjawadekar
actor shalv kinjawadekar

आता कालच्या भागात स्वीटूल ओम बद्दल सर्वकाही समजलं त्यांनी आपल्या बाबांचा जीव वाचावा म्ह्णून लग्नमंडपातून बाहेर पडून बाबांचा जीव वाचवला. त्यामुळे ती ओमला दूर जाण्यापासून अडवते पण हे सगळं समजलं तरी स्वीटूच लग्न आहे. त्यामुळे ओम काहीच बोलत नाही तर इकडे स्वीटूची आई देखील ओमच्या आईला मोहित आणि स्वीटूच लग्न झाली त्यामुळे त्यादोघांनी पुन्हा एकत्र येऊ नये असं म्हणतांना पाहायला मिळाली. मालिकेत आता बराच उलगडा झाला असला तरी मालिका इतक्यात संपणार नाही. काही दिवसांपूर्वीच मालिकेतला ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर ह्याने ओम बँडबॉयच्या रूपात दिसणार असं म्हटलं आहे त्यासोबत त्याने काही फोटो देखील अपलोड केले आहेत. आपला हेतू साध्य करण्यासाठी ओम स्वतःला बॅड बॉयच्या भूमिकेत कसा सर्वांना सामोरे जातो हे पाहणे आता रंजक होणार आहे त्याच्या अशा वागण्याने कोणा कोणाला खास करून स्वीटूला रुचनार का? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.मात्र असे असले तरी ओमच्या मूळ स्वभावाची जाणीव त्याच्या जवळच्या व्यक्तींना नक्कीच होणार आहे. आणि तो असा का वागतो आहे हेही लवकरच सगळ्यांसमोर उघड होईल.

yeu kashi tashi mi nandayla actor om
yeu kashi tashi mi nandayla actor om

शाल्व किंजवडेकर याने शांत आणि समजूतदार ओमची भूमिका चांगली वठवली आहे. सर्वाना मदत करणार भोळ्या चेहऱ्याचा ओम आता नक्की कसा दिसणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. आता तो बॅड बॉय बनून विरोधी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. ही भूमिका देखील तो तितक्याच सहजतेने निभावेल का? शांत स्वभावाचा ओम आता रागीट चेहऱ्यात शोभेल का? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला बसले असतील पण ह्याच उत्तर तुम्हाला येत्या काही भागात नक्कीच पाहायला मिळणार आहे. आता पर्यंत सर्वाना हवा हवासा सध्या स्वभावाचा ओम बॅड बॉयच्या रूपातही प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडेल ह्यात शंका नाही पण ह्या सर्वामुळे मालिकेचा टीआरपी चांगलाच ढासळला होता आता तरी मालिकेतील लेखन आणि कलाकार मनावर घेऊन मालिकेत योग्य तो बदल घडवून आंतील अशी आशा बाळगुयात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here