बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि अभिनेत्री उमा भेंडे ह्यांचं खर नाव “अनसूया साकरीकर” असं होत. पण उमा हे नाव त्यांना लता दिदींनीच दिलं आणि पुढे त्या त्याच नावाने प्रसिद्ध झाल्या. त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टीत खूपच कमी देखण्या अभिनेत्री असायच्या त्यात उमा भेंडे ह्या एक सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून त्या आजही ओळखल्या जातात. आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मराठी चित्रपट अभिनेते प्रकाश भेंडे ह्यांच्याशी त्यांनी विवाह केला. प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे यांनी एकत्रित अनेक चित्रपट केले. अनेक मराठी चित्रपटांच्या ओपनिंगसाठी ह्यादोघांना आवर्जून बोलावलं जायचं. ‘श्री प्रसाद चित्र’ ह्या निर्मिती संस्थेची त्यांनी स्थापना देखील केली. त्यातून त्यांनी अनेक उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती देखील केली. वृद्धापकाळाने १९ जुलै २०१७ ह्यादिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे ह्यांना दोन मुले, प्रसाद आणि प्रसन्न अशी त्यांची नावे. प्रसाद भेंडे हा मराठी सृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सांभाळतो.

“दुनियादारी” हा त्याचा पहिलाच चित्रपट खूपच गाजला होता. प्यारवाली लव्हस्टोरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सविता दामोदर परांजपे अश्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. अभिनेत्री “श्वेता महाडिक भेंडे” ही प्रसाद भेंडे याची पत्नी आहे. गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक श्रीनगर स्वाभिमान अशा हिंदी मालिकामध्ये ती झळकली आहे. श्वेता आणि प्रसाद ह्या दोघांना ‘अभिर’ नावाचा मुलगा देखील आहे.