महेश कोठारे निर्मित ”दख्खनचा राजा ज्योतिबा” ह्या मालिकेत ‘चोपडाईची’ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. चोपडाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव सई कल्याणकर असं आहे. या मालिके व्यतिरिक्त ती बऱ्याच मालिकांत देखील पाहायला मिळाली आहे. अभिनेता अंकुश चौधरी ह्यांच्यासोबत तिने झकास ह्या चित्रपटात देखील काम केलं आहे. सई कल्याणकर हि एक उत्कृष्ठ नृत्यांगना असून भरत नाट्यम मध्येही तिने विशारद प्राप्त केली आहे. स्टार प्रवाहवरील ”तुझे नि माझे घर श्रीमंताचं” या मालिकेतून देखील तिने महत्वाची भूमिका बजावली होती.

इतकंच नाही तर झी युवा मराठी वरील फ्रेशर्स या मालिकेत देखील ती झळकली होती. याच बरोबर कलर्स मराठीवर ”गणपती बाप्पा मोरया” ह्या ऐतिहासिक मालिकेत देखील तिने सिद्धी ची व्यक्तिरेखा साकारली होती. आपला सुंदर चेहरा गोड़ आवाज आणि नृत्यामुळे तिला अनेक ऐतिहासिक मालिका मिळाल्या आणि तिने त्या उत्कृष्ठरित्या साकारल्या देखील. ”भेटी लागी जिवा” या लोकप्रिय मालिकेतून देखील सईने महत्वाची भूमिका निभावली होती आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे तिला एका मागून एक मालिका मिळत गेल्या. विशेष म्हणजे हे सगळं चालू असताना देखील अथर्व थिएटरच्या आम्ही पाचपुते ह्या नाटकात देखील ती झळकली. मालिका चित्रपट आणि नाटके ह्या तिहेरी बाजूत तिने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली. भूमिका कोठलीही असो त्या भूमिकेला तिने नेहमीच योग्य न्याय देण्यात यश मिळवले आहे. हे सर्व पाहता महेश कोठारेंच्या कोठारे व्हिजनच्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत तिला विशाल निकम सोबत मुख्य भूमिका साकारण्यास मिळाली.

मराठी अभिनेत्री सई कल्याणकर हीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तिचा होणारा पती ”प्रशांत शिवराम चव्हाण” हा डॉक्टर आहे. डॉ प्रशांत चव्हाण यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. अभिनेत्री सई कल्याणकर आणि डॉ प्रशांत चव्हाण यांचं हे अरेंज मॅरेज असणार आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्याचा हा साखरपुड्याच्या सोहळा संपन्न झाला आहे. साखरपुड्याच्या हा सोहळा दोघांनीही एन्जॉय केलेला पाहायला मिळाला दोघांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याच सर्व काही सांगून जात होत. येत्या काही दिवसांतच दोघे हे दोघे लग्नगाठ देखील बांधणार आहेत पण त्या दिवसाची तारीख अजून स्पष्ठ झालेली नाही. मराठी अभिनेत्री सई कल्याणकर आणि डॉ प्रशांत चव्हाण याना त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..