Home Entertainment या कारणामुळे झी मराठी अवॉर्ड्स २०२१ वर प्रेक्षक दर्शवत आहेत नाराजी

या कारणामुळे झी मराठी अवॉर्ड्स २०२१ वर प्रेक्षक दर्शवत आहेत नाराजी

68967
0
prathna and hruta durgule
prathna and hruta durgule

झी वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजक केलं आहे गेली अनेक वर्ष एकाहून एक उत्तम मालिका झी वाहिनी घेऊन आली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच त्याच मालिका वाढवण्याचा प्रकार झाला मालिका वाढवायची म्हणून जुन्या प्रसिद्ध कलाकारांना मालिकेत घेऊन नवा ट्विस्ट निर्माण केला गेला त्यामुळे झी वाहिनीच्या प्रेक्षकांनी मालिकांवर पाठ फिरवली. पण जुन्या मालिका संपवून झी ने योग्य निर्णय घेत नव्या मालिका आणल्या ज्या प्रेक्षकांना खूपच आवडलेल्या पाहायला मिळत आहेत. नुकताच झी अवॉर्ड सोहळा देखील झाला पण प्रेक्षकांना त्यात अनेक उणिवा जाणवल्या अनेकांनी योग्य कलाकारांवर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे.

actress hruta durgule
actress hruta durgule

माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका सध्या सर्वांचीच लोकप्रिय मालिका ठरली आहे. पण म्हणून एकाच अभिनेत्रीला ३ पुरस्कार देणे प्रेक्षकांना रुचलेले पाहायला मिळत नाहीत. मन उडू उडू झालं ह्या मालिकेतील अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा अभिनय देखील उत्तम आहे शिवाय ती लक्षवेधी अभिनेत्री देखील आहे. मालिकेत तिचं वर्चस्व दिसून येत. डान्स, डायलॉग, रडणं, मुरडन आणि हळवेपणा तिचं सर्वकाही पाहण्यासारखं आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. “दुर्वा”, “फुलपाखरू” आणि आताच्या “मन उडू उडू झालं”ह्या मालिकेत तिचा अभिनयात सर्वात चांगला असल्याचं बोलल गेलं. मग इतकं सगळं असून देखील ऋताला एखादातरी पुरस्कार का दिला गेला नाही असं अनेकांनी म्हटलेलं पाहायला मिळतय. पण मित्रानो झी वाहिनीने ह्यापूर्वी देखील ऋताला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. २०१९ साली ऋताला झी ने “झी युवा सन्मान २०१९” सन्मानित करण्यात आलं होत. यांनतर झी वाहिनीने “मोस्ट नॅच्युरल परफॉर्मन्स ऑफ द इअर”ने सन्मानित केलं होत. विशेष म्हणजे संस्कृती कलादर्पण २०१९ चा बेस्ट ऍक्टरेस अवॉर्ड “दादा गुड न्युज आहे”ह्या नाटकासाठी ऋताला देण्यात आला होता.

man udu udu zal actress hruta
man udu udu zal actress hruta

अभिनेते आणि अभिनेत्रींच्या आयुष्यात नॉमिनेशन आणि अवॉर्ड्स याना खूपच महत्व असत. त्यामुळे अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना आपण योग्य काम करत आहोत ह्याची पावती मिळते. ऋता सर्वच गोष्टीत निपुण आहे ती दिसते देखील खूपच सुंदर ह्यामुळेच लोकांना हि गोष्ट जास्त खटकलेली पाहायला मिळाली. पण लोकांच्या मनातील ह्या भावनाच ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचे दिसून येते. अवॉर्ड मिळणे न मिळणे हे तिच्या हातात नाही पण त्यांसाठी तिने मालिकांत घेतलेली मेहनत खरोखरच लक्षवेधी आहे. काही दिवसांपूर्वी मन उडू उडू झालय ह्या मालिकेत ती जाड दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं होत. पण त्यावर चांगली मेहनत घेऊन व्यायाम करून ती पुन्हा सडपातळ झालेली पाहायला मिळतेय हेच तिच्या मेहनतीचं आणखीन एक उदाहरण म्हणावं लागेल. असो अश्या ह्या मेहनती अभिनेत्रीला म्हणजेच अभूनेत्री ऋता दुर्गुळे हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here