माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने आता वेगळे वळण घेतले आहे. सर्वांच्या मनात घर करून गेलेली हि मालिका आज लोकांना पाहवेनाशी झालीय मालिकेच्या वेळेत बदल देखील करण्यात आलाय. यश आणि नेहा यांच्या लग्नानंतर मालिका वेगवेगळे वळण घेऊ लागली इथेच नेहाच्या पहिल्या पतीची एन्ट्री झाली आणि मालिकेची सगळी सूत्रच बदलली. आता मालिकेत शेफाली आणि समीर यांची जवळीक दाखवली आहे. पण त्यातही विघ्न म्हणून कि काय आता समीरच्या बहिणीची देखील एन्ट्री झालेली पाहायला मिळते. समीरची बहीण शेफीवर आरोप देखील करताना पाहायला मिळाली. तू माझ्या भावाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतेस तू त्याच्यापासून दूर राहा अशी ती म्हणते.

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत समीरची गर्लफ्रेंड शेफालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “काजल काटे”. अभिनेत्री काजल काटे मूळची नागपूरची. अभिनयाची आवड तिला अगदी बालवयापासूनच होती कॉलेजमध्ये असताना नागपूर येथे त्यांच्या नाटकाच्या ग्रुपने ठीक ठिकाणी नाट्यपथकं आयोजित केली होती त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती घडवण्याचे काम त्यांनी केले होते. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत तिला अभिनयाची संधी मिळाली. झी युवा वरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत तिने मोगराची भूमिका देखील तिने बजावली. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून तिने आयेशा बेगम हे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर पुन्हा झी मराठीमध्ये येण्याची नामी आधी तिच्याकडे चालून आली. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत दिग्गज कलाकारांसोबत काम करता आल्याने ती चांगलीच खुश झाली. या कलाकारांकडून तिला खूप काही शिकता आलं अशी ती म्हणते. अभिनेत्री काजल काटे हि २०१९ साली प्रतीक कदम सोबत विवाहबद्ध झाली. काजलची थोरली बहीण “स्नेहा काटे शेलार” ही देखील मराठी हिंदी मालिका अभिनेत्री आहे. स्नेहा काटे शेलार ही ‘स्नेहा अशोक मंगल’ या नावाने ओळखली जाते. सध्या अँड टीव्ही वरील ‘एक महानायक डॉ बी आर आंबेडकर’ या मालिकेतून जिजाबाईची भूमिका साकारत आहे.

शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटे हीचा पती प्रतीक कदम हा खूपच खास व्यक्ती आहे. प्रतीक कदम हा मुंबई इंडियन्स ह्या आयपीएल सामन्यातील टीमचा तो एक महत्वाचा भाग आहे. प्रतीक कदम गेली कित्तेक वर्ष मुंबई इंडियन्स टीमला फिटनेसचे प्रशिक्षण देतोय. मुंबई इंडियन्स टीमच्या फिटनेसवर तो चांगलं प्रशिक्षण देताना पाहायला मिळतो. शेफाली साकारणारी त्याची पत्नी अभिनेत्री काजल काटे हि देखील अनेकदा आयपीएल सामने पाहायला जाते त्यावेळी मुंबई इंडियन्स टीम सोबतचे बरेचसे फोटो ती सोशिअल मीडियावर देखील अपलोड करताना पाहायला मिळते. सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. सेमीफायनलमध्ये भारत इंग्लंडसोबत हरला असला तरी आधीच्या सर्व सामन्यांत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळते.