अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर येत्या २ डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरु असून काल अभिनेत्री अक्षय देवधर हिच्या घरी केळवणाचा कार्यक्रम पार पडला. ह्यावेळी हार्दिकने तिच्यासाठी विणलेली साडी तिने परिधान केलेली पाहायला मिळाली. नुकताच हार्दिकचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील बरकत म्हणजे अभिनेता अमोल नाईक ह्याने “दाजी को लेकर आ रहा हू मैं…..” असं कॅप्शन देत मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या हातावर “अहा” अ म्हणजे अक्षया आणि हा म्हणजे हार्दिक अशी मेहदी काढलेली पाहायला मिळतेय. बरकत मालिकेत अंजलीला आपली बहीण मानतो तसेच खऱ्या आयुष्यात देखील अमोल अक्षयाला बहीण बनतो. रक्षाबंधनाला देखील ह्यांचे अनेक फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया देवधर हीच अभिनेता हार्दिक जोशी ह्याच्याशी लवकरच लग्न होणार आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांनी साखरपुडा देखील केला होता. तुझ्यात जीव रंगला या एकाच मालिकेत राणा आणि अंजली ह्यांची आगळी वेगळी लव्ह स्टोरी पाहायला मिळाली. पण मालिका साकारताना ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं आणि आता हे दोघे लग्न बंधनात देखील अडकणार आहेत. अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. आता त्यांची लग्नघटिका जवळच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. येत्या २ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यातील कर्वेरोडवरील पंडित फार्म्स येथे त्यांचं शाही थाटात लग्न पार पडणार आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सेलिब्रिटी जोडप्याचं याच ठिकाणी लग्न पार पडलं होतं. त्यावेळी हे फार्म हाऊस अक्षया आणि हार्दीकला देखील खूप आवडलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणाला भेट देऊन त्यांनी इथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
