Home Entertainment “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेत रेवती साकारणारी अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कलाकाराची मुलगी

“माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेत रेवती साकारणारी अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कलाकाराची मुलगी

5228
0
nupur and swati daithankar
nupur and swati daithankar

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेने आता वेगळ वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत नेहा आपलं पूर्वीच आयुष्य पूर्णपणे विसरून गेली असून तिची एका मीटिंगमध्ये तिचा पती यशच्या समोर येते. नेहा यशला ओळखत नाही मात्र यश एकटक तिच्याकडेच पाहत राहतो. माझी पत्नी अगदी हुबेहूब तुझ्यासारखीच दिसते असं तो नेहाला सांगत आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो दाखवतो. पण हा फोटो खोटा असून यश आपल्याला फसवतोय असच तिला जाणवत. पण आता तिने तिच्या लॅपटॉपवरून यशाच्या लग्नाचे आणि चौधरी फॅमिलीचे फोटो पहिले अन तिला यशच्या बोलण्यावर विश्वास बसतो. यशच्या पत्नीत आणि माझ्यात बरच साम्य असल्याचं तिला समजल्यामुळे आता ती यशच्या बिझनेसमध्ये पार्टनर होण्यास देखील तयार होते.

nupur and swati daithankar
nupur and swati daithankar

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत परीला डान्स शिकण्यासाठी एक डान्स टीचर देखील आहे. सिम्मी काकू परीची डान्सटीचर म्हणून रेवतीची निवड करते. आणि तिला परीला डान्स शिकवण्यासाठी ती रेवतीला चौधरी पॅलेसमध्ये घेऊन येते. यश सोबत लग्न करण्यासाठी सिम्मीने हा सगळा डाव रचलेला असतो ज्यात रेवती देखील आपला होकार दर्शवते. मालिकेत रेवती हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ह्यापूर्वी देखील पाहिलं असेल. रेवती हे पात्र अभिनेत्री नुपूर दैठणकर हि साकारत आहे. नुपूरने या पूर्वी देखील अनेक मालिकांत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मराठीच्या बाजी या मालिकेत तुम्ही तिला पाहिलं असेलच. नुपूर दैठणकर हिची आई देखील प्रसिद्ध कलाकार आहे. नुपुरची आई डॉ स्वाती दैठणकर या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आहेत. देश विदेशात त्यांचे शास्त्रीय नृत्याचे अनेक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडतात. नुपूरनाद या नृत्यालयाची त्यांनी स्थापना केली असून अनेक अभिनेत्री देखील त्यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवताना पाहायला मिळतात. नुपूर देखील उत्तम नृत्यांगना आहे. शिवाय दिसायलाही खूपच सुंदर त्यामुळे मालिकेत काम करायची संधी तिला सहजपणे मिळाली. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत नुपूर देखील नृत्याचे धडे इतर कलाकारांना देताना पाहायला मिळते. नृत्य हि तिची पहिली आवड असल्याचं ती म्हणते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here