अभिनेत्री आणि क्रिकेटर ह्यांच्या खऱ्या आयुष्यात ते काय करतात ह्याची उत्सुकता कायमच चाहत्यांच्या मनात लागून असते. आयपीएल सामन्यातील खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. अभिनेत्री सायली संजीव हिच्या एका फोटोवर ऋतुराज गायकवाड याने एक कमेंट करत हार्टचे इमोजी शेअर केले होते होते. दोघांच्या चाहत्यांनी त्या कमेंटवर लाईक्सचा पाऊस पडला आणि तेंव्हापासून हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत अश्या अनेक बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. हे प्रकरण खूप वाढतंय हे पाहून क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याने केलेली ती कमेंट डिलीट करून टाकली. पण सोशल मीडियावर लोक त्याच्या प्रत्येक फोटोवर सायलीच आणि सायलीच्या फोटोवर ऋतुराजच नाव टाकून चिडवायचे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड याने उत्तम खेळ केला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा आणि ६ वेळा शतकी खेळी करून त्याने मालिकावीर आणि सामनावीर असे दोन्ही ‘किताब पटकावले. एका सामन्यात त्याने वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला. एकाच ओव्हरमध्ये त्याने ७ षटकार मारण्याचा विश्व् विक्रम देखील केला. ह्या ओव्हरमध्ये १ नो बॉल पडला आणि त्या बॉलवर देखील त्याने षटकार मारल्याने हा विक्रम करता आला. आजवर कोणीही असा विक्रम केला नाही ऋतुराज गायकवाड हा पहिला खेळाडू आहे ज्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये हा विक्रम केला आहे. पण ह्या विक्रमामुळे अभिनेत्री सायली संजीव हि पुन्हा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. झी मराठीच्या बस बाई बस या शोमध्ये सुबोध भावे याने देखील बोलता बोलता हा मुद्दा काढला. तुमचं अफेअर आहे का? असं सुबोधने विचारल्यावर सायली म्हणते, ” ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे हे दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत. हे दोघेही माझी काहे दिया परदेस ही मालिका बघत होते. तेव्हापासून हे दोघेही माझे चाहते झाले होते. परंतु क्रिकेटर मालिका कुठे बघत असतील कारण त्यांना तेवढा वेळही मिळत नसतो असे मला वाटायचं. पण ऋतुराज बद्दल सांगायचं तर तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे आणि आमच्यात केवळ मैत्री आहे.” असं ती म्हणाली आणि इथेच हा विषय संपवला. पण आता नव्याने हा मुद्दा पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याने पुन्हा अखेर तिने आपले मौन सोडले.

सायली म्हणते की, ‘ ऋतुराज आणि आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. आम्ही एकमेकांसोबत बोलतही होतो मात्र जेव्हापासून आमच्या नात्याला एक वेगळा अर्थ लावण्यात आला तेव्हापासून आमच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा येत गेला. आमच्या निखळ मैत्रीवर त्याचा खूप वाईट परिणाम झाला. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे पाहून आम्ही आता मित्रासारखं धड बोलुही शकत नाही आहोत. मी २९ वर्षांची आहे आणि तो २५ वर्षांचा आहे याबद्दल देखील मी वेळोवेळी खुलासा केला होता . याबाबत अनेक चर्चाही पाहायला मिळाल्या परंतु आता आमच्यातील हे मैत्रीचं नातं इतकं दूर गेलं आहे की आमच्यात आता काहीच बोलणं देखील होत नाही. या सगळ्या चर्चेमुळे आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम झाला आहे’. लोकांनी चुकीचा अर्थ लावल्यामुळे आमच्या मैत्रीच्या नात्यात मोठा दुरावा आला असल्याचं सायलीने सांगितलं. आमच्यात कधीही अफेअर नव्हतं असं देखील तिने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आतातरी लोक तिला असा प्रश्न विचारणार नाहीत अशी आशा आहे.