शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील अभिनेता सुयश टिळक ह्याने गेल्या महिन्यात साखरपुडा उरकला होता. ” माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री” असं म्हणत अभिनेता सुयश टिळक ह्याने साखरपुड्याची फोटो शेअर केले होते. सुयश कलर्स मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत काम केल्यानंतर खरोखरच त्याच शुभमंगल करत असल्याचं दिसून येतंय. सुयशने ज्या मुलीसोबत साखरपुडा केलाय ती देखील एक मराठी अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आयुषी भावे आहे. नुकतंच त्यांचा हळदीचा सोहळा देखील संपन्न झाला.

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता आम्ही अधिकृतरीत्या एकत्र आलो असून नवीन प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहोत असं सुयशने काही दिवसांपूर्वीच म्हटलं होत. त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आता आला असून त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याचं बराच काही सांगताना दिसतंय. नुकतीच त्यांची हळद झाली त्या सोहळ्यात मोजकीच माणसे उपस्थित असल्याचे दिसून येते. सुयशच्या आयुष्यात आलेली मुलगी हि अभिनेत्री असून २०१८ चा श्रावण क्वीनचा किताब तिने मिळवला होता. झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये देखील तिने आपला सहभाग दर्शवला होता. “या गावच कि त्या गावच” ह्या चित्रपटात देखील तिने काम केलं आहे. शिवाय ती एक उत्तम डान्सर देखील आहे. अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…