अभिनेते सचिन पिळगावकर हे ९० च्या दशकातले मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. दिग्दर्शक असूनही त्यांनी त्यावेळी आपल्याच चित्रपटांत कधी नोकराच्या तर कधी साडी घातलेल्या महिलेच्या भूमिका साकारल्या. त्यांचा “आयत्या घरात घरोबा” हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला होता. सचिन सोबत ह्या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे तसेच राजेश्वरी सचदेव ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. आज आपण अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत…

आयत्या घरात घरोबा चित्रपटातली अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने “कानन” ची भूमिका साकारली होती. चित्रपटात कानन हि सचिन पिळगावकर ह्यांची बहीण दाखवली होती जी नंतर लक्ष्याच्या प्रेमात पडते. अभिनेत्री राजेश्वरी सचदेव ही थेटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना म्हणूनही ओळखली जाते. “आयत्या घरात घरोबा” हा तिने साकारलेला पहिला वहिला मराठी चित्रपट. या चित्रपटानंतर श्याम बेनेगल यांनी ‘सुरज का सांतवा घोडा’ चित्रपटात तिला काम दिले. सरदारी बेगम, हरी भरी, द फरगॉटन हिरो, वेलकम तू सज्जनपूर अशा बॉलिवूड चित्रपटातून ती झळकली.ती एक उत्तम सुत्रसंचालिका देखील आहे. अनेक हिंदी कार्यक्रमांत तिने संचालन केले आहे. अनेकांना हे माहित नसेल कि तिने वरुण वडोला ह्या अभिनेत्याशी लग्न केलं. वरुण वडोला हा हिंदी मालिका अभिनेता म्हणून ओळखला जातो. ये है मुंबई मेरी जान , कोशीश एक आशा, सोनी महिवाल, अस्तित्व एक प्रेम कहाणी अशा अनेक दर्जेदार मालिकेतून कधी विनोदी भूमिका तर कधी गंभीर भूमिका त्याने साकारल्या आहेत.