ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं आणि चिर:तरुण जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचही तितकंच कौतुक केले जातं, पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे. एका नाटकात एकत्रित काम करत असताना अविनाश नारकर आणि ऐश्वर्या यांची ओळख झाली होती इथेच त्यांच्या प्रेमाचे सूर जुळून आले होते मात्र नाटकाचे प्रयोग संपत आले तरीही या दोघांनी एकमेकांना कधीच प्रेमाची कबुली दिली नव्हती.

शेवटी पुन्हा कधीच भेट होणार नाही याविचाराने ऐश्वर्या नारकर यांनी पुढाकार घेत नाटकाच्या अगदी शेवटच्या प्रयोगाच्या दौऱ्यावेळी आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्नही केले. नाटक, चित्रपट यासोबतच अनेक मालिकांमधून या दोघांनी एकत्रित काम केले आहे. या दोघांना एक मुलगाही आहे त्याचे नाव “अमेय नारकर”. अमेय मराठी सृष्टीत फारसा सक्रिय नसला तरी नृत्याची त्याला विशेष आवड आहे. दिसायला अतिशय देखणा असलेला अमेय भविष्यात कलाक्षेत्रात आल्यास वावगे ठरायला नको. अमेय नारकर सिंगल नसून त्याला गर्लफ्रेंड देखील आहे. आज याच कारणामुळे अमेय सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. तृशाला नायक असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव असून ‘मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स’ ही पदवी तिने प्राप्त केली आहे. अनेकदा नारकर कुटुंबासोबतचे तृशालाचे फोटो याचकारणामुळे चर्चेत येत आहेत. अमेय आणि तृशाला हे दोघे खूप वर्षांपासूनचे मित्र आहेत. नारकर कुटुंबातही ती अगदीच छान रुळली देखील आहे. त्यांच्या एकत्रित फोटोमुळे ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून तृशाला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.