गेल्या काही दिवसांपूर्वी जेष्ठ गायक सुरेश वाडकर नाशिक येथे एका लघुपटाच्या प्रदर्शनासाठी गेले एका घडलेल्या घटनेचा उलगडा केला आहे. त्यांच्यावर घडलेल्या त्या घटनेमुळे त्यांना कितीत्रास सहन करावा लागला हे ह्यातून समजते. पोलीस आयुक्तालयात “भूमाफिया” या लघुपटाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी गायक सुरेश वाडकर ह्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात गायक सुरेश वाडकर यांनी आपल्या बाबतीत जे घडलं त्यामुळे मी गेल्या ११ वर्षांपासून हा त्रास सहन करत असल्याचं सांगितलं. पाहुयात हे नक्की काय प्रकरण आहे.

सुरेश वाडकर हे मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध गायक म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे भारतातच नाही तर पदेशातूनही अनेक लोक संगीत आणि गायन शिकण्यासाठी सुरेश वाडकरांकडे येतात. ह्या कारणामुळे नाशिकला अकॅडमी सुरु करायचे त्यांनी ठरवले. आपल्या मित्राच्या मध्यस्तीने सुरेश वाडकर आणि सोनू निगम ह्या दोघांनी नाशिकमध्ये जमीन खरेदी केली होती. पण जमीन वादग्रस्त होती हे समजायला खूप वेळ गेला शिवाय ज्या मित्राने ती जमीन दाखवली त्यावर अति विश्वास ठेवण्याने वाडकर आणि सोनू निगम दोघांची चांगलीच फसवणूक झाली. त्यानंतर आम्ही ते प्रकरण कोर्टात नेलं पण तेथेही आम्हाला न्याय मिळेना झालाय. काही दिवसांपूर्वी सोनू निगम ह्या गोष्टीला खूप कंटाळला आणि त्याने ह्यातून काढता पाय घेतला. अनेक राजकीय लोकांशी हितसंबंध असूनही मला ह्या गोष्टीत न्याय मिळाला नाही. कोर्टात केस असल्याने गेली ११ वर्ष मला शासनाचा एकही गायकीचा ऍवॉर्ड मिळला नाही. माझं सिलेक्शन होऊन देखील कोर्टात नाव असल्याने माझं नाव दरवेळी त्या यादीतून काढलं जात.

मध्यंतरी ह्या सर्वाला कंटाळून मी देश सोडून जाण्याचाही विचार केला होता. पण ह्या केसमधून माझी मुक्तता झाली तर मी नक्कीच पुन्हा परदेशात जाण्याचा विचार करेन. कोर्टकचेऱ्या, जमिनीचा वाद यामुळे मानसिक तानही आला. आजही त्यांना या प्रकरणी न्याय मिळाला नसून त्यांची ही लढाई संपलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र गेल्या वर्षी मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी मला या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे आश्वस्त केले आहे. त्यांच्यामुळे माझा ११ वर्षांचा त्रास संपेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही सुरेश वाडकर यांना न्याय मिळवून देऊ…असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे म्हणणे आहे. एका जेष्ठ गायकाला जर असा त्रास सहन करावा लागत असेल तर सामान्य माणसाचे किती हाल होत असतील हे आपल्या विचारा पलीकडची गोष्ट आहे असच चित्र दिसत.