Home Movies तुम्हाला हे माहित आहे? सचिन पिळगावकर यांना सख्खी बहीण असून ती ऑस्ट्रेलिया...

तुम्हाला हे माहित आहे? सचिन पिळगावकर यांना सख्खी बहीण असून ती ऑस्ट्रेलिया येथे आहे स्थायिक

1078
0
sachin pilgaonkar sister photo
sachin pilgaonkar sister photo

शरद पिळगावकर हे अभिनेते म्हणून सर्वपरिचित तर होतेच पण पुढे निर्माते म्हणून त्यांनी आपला ठसा उमठवला. शरद पिळगावकर यांचा सचिन पिळगावकर मुलगा बालवयापासूनच चित्रपट सृष्टीत यावा हे त्यांचं स्वप्न होत. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तो सिनेसृष्टीकडे वळला. खूपच कमी लोकांना हे माहित असेल कि शरद पिळगावकर यांचा छोटासा ऑर्केस्ट्रा होता तिथूनच त्यांनी सुरवात केली यामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना खूपच साथ दिली. सचिनचे वडील शरद आणि आई दोघेही ह्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणं गायचे. हाच ह्या दोघांमधील गुण सचिनने देखील आत्मसात केला. सचिनचे वडील आणि अशोक सराफ खूप चांगले मित्र होते. चोरावर मोर, अपराध, अष्टविनायक असे चित्रपट त्यांनी बनवले.

sachin pilgaonkar family
sachin pilgaonkar family

सचिन पिळगावकर हे अवघ्या ४ ते ५ वर्षांचे असताना एकला ह्या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. त्यानांतर एकामागून एक हिंदी चित्रपट त्यांना मिळत गेले. एक टॅलेंटेड बालकलाकार हिंदी सृष्टीला लाभला असं अनेकांचं मत होत. त्यामुळेच हिंदी बरोबर विविध भाषेसाठी सचिननेच आपल्या चित्रपटांत काम करावं असं त्यावेळच्या दिग्दर्शकाना वाटायचं. त्यावेळी बालकलाकार म्हणून “सर्वोत्कृष्ट बालकलाकार” या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना नावाजले होते. हिंदीसोबत काही भोजपुरी चित्रपटात देखील सचिन पाहिला गेला. पण पुढे त्याने मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या चित्रपटांत देखील स्वतः सचिन काम करताना पाहायला मिळायचा. त्यावेळी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर असे दोन आघाडीचे दिग्दर्शक होते जे दिग्दर्शनासोबत नायकाची भूमिका देखील साकारताना पाहायला मिळाले. क्वचितच ह्या दोघांनी एकत्रित काम केलं असेल. त्यावेळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जमाना होता. सचिन अशोक सराफ ह्यांना तर महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना चित्रपटासाठी प्रथम प्राधान्य देऊ लागले. १ डिसेंबर १९८५ रोजी सचिनने अभिनेत्री असलेली आपली सहकालाकार सुप्रिया हिच्याशी लग्नगाठ बांधली.

trupti pilgaonkar sachin pilgaonkar sister
trupti pilgaonkar sachin pilgaonkar sister

खूपच कमी लोकांना हे माहित असेल कि सचिन पिळगावकर ह्यांना एक सख्खी बहीण देखील आहे. सचिनचा चेहरा आणि त्याच्या बहिणीचा चेहरा ह्यांच्यात फारच साम्य दिसून येत होत. शरद पिळगावकर हे स्वतः निर्माते आणि मुलगा अभिनेता आणि डायरेक्टर असून देखील सचिनची सख्खी बहीण सिनेसृष्टीत आली नाही ह्याच कारण समजू शकलं नाही. तृप्ती पिळगावकर हे सचिन पिळगावकर यांच्या बहिणीचे नाव आहे. दोघेही भाऊ बहीण दिसायला एकसारखे असल्याने त्यांना प्रत्यक्षात पाहणारे एकमेकांची कार्बन कॉपी म्हणूनच जास्त ओळतात. तृप्ती पिळगावकर यांचं संपूर्ण शिक्षण मुंबई मधेच झालं आहे. तृप्ती पिळगावकर ह्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक आहेत. पण धूमधून त्या आजही मुंबईला आपल्या भावाकडे येताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी भाऊबीज निमित्ताने अभिनेता सचिन पिळगावकर ह्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या बहिणीची चाहत्यांना ओळख करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here