Home Movies पुण्यातील अवधुतचं फार्म हाऊस पाहिलंत म्हणतो लई दमलो कि शेतावर जायचं आणि...

पुण्यातील अवधुतचं फार्म हाऊस पाहिलंत म्हणतो लई दमलो कि शेतावर जायचं आणि फ्रेश व्हायचं

2039
0
avdhoot gupte bhor farm house
avdhoot gupte bhor farm house

मित्रांनो ह्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून आपण बाहेर फिरायला जातो पण गावाकडची मजाच काही वेगळी असते. बाहेर कुठेतरी जाण्यापेक्षा आपल्या शेतात गावाकडं जाणं अनेकजण पसंत करतात. गावाकडची आपली माणसं, आपलं शेत, आपली जनावरं आणि काळ्या मातीतली शेती पाहून डोळे प्रसन्न होतात आलेला थकवा देखील नाहीसा होतो. ह्या मोबाईलच्या युगात तेवढाच एक विरंगुळा म्हणून अनेक कलाकार देखील आपल्या गावी जाताना पाहायला मिळतात. अभिनेता गायक तसेच दिग्दर्शक असलेला अवधूत गुप्ते याला देखील हा मोह आवरत नाही. नुकतेच आपल्या फार्म हाऊसच्या परिसरातील काही फोटो त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. लय दमलो की शेतावं जायचं, गाणं गायचं फ्रेस्स व्हायचं! असे म्हणत अवधूतने काही फोटो शेअर केले आहेत.

gupte farm house pune bhor
gupte farm house pune bhor

अवधुतचं हे फार्म हाऊस पुण्यापासून अगदी जवळ आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ‘जयतपाड’ या गावी अवधुतचे गुप्ते फार्महाऊस आहे. “गुप्ते फार्महाऊस” असं त्याच नाव देखील त्याने दिलय. अनके मित्रमंडळी आणि कधी परिवारासोबत अवधूतसोबत ह्या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. कामातून विरंगुळा म्हणून आपल्या फार्म हाऊसला भेट देत थकवा दूर करतो. ह्या फार्म हाऊसचा व्ह्यूव खूपच सुंदर आहे. इतकाच नाही तर आमचे मित्र धुमाळ ह्यांचे “डोंगरमाथा रेस्तरॉं भोर हुन भाटघर धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने जाताना तुम्हाला जे सृष्टिसौंदर्य अनुभवायला मिळेल ते अतुलनीय. हे सगळं पाहून स्वित्झर्लंडचे सौंदर्य देखील फिके पडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. भाटघर घरणाच्या जवळ असलेले हे फार्म हाऊस सध्या पावसाळ्यात तर निसर्गसौंदर्याने नटलेले पाहायला मिळत आहे. आपल्या व्यस्त कामातून एक विरंगुळा म्हणून कुठे जायचे असेल तर आपण अशाच ठिकाणांचा शोध घेत असतो. त्यामुळे अवधुतचे हे फार्म हाऊस अनेकांच्या नजरेत भरलेलं पाहायला मिळत आहे. ह्या घराचा खास लूक अवधुतने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतो.

avdhoot gupte farm house
avdhoot gupte farm house

मार्च १९९६ सालच्या टिव्हीएस स रे ग म प च्या शो मध्ये त्याने भाग घेतला होता. ह्या शोचं विजेतेपद त्याने पटकावले होते आणि इथून पुढे त्याला आपला मार्ग सापडला. अवधूतच्या आई आणि वडिलांना त्याचं गायन आवडायचं पण पोटापाण्यासाठी त्याने काहीतरी वेगळं क्षेत्र निवडावं असं त्यांना मनापासून वाटायचं. पण स रे ग म प हा शो जिंकला आणि त्याच आयुष्य बदलून गेलं. वैशाली सामंतच्या जोडीने त्याने ऐका दाजीबा हा अल्बम काढला त्याला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती. झेंडा या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. सध्या सूर नवा ध्यास नवा या रिऍलिटी शोमध्ये तो परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. उत्तम गायक दिग्दर्शक संगीतकार अशी त्याची ओळख अवधूतने निर्माण केली आहे. आपण कितीही मोठा माणूस झालो तरी परदेशात किंवा इतर कुठे फिरण्यापेक्षा स्वतःच्या फार्महाऊसला भेट द्यायला त्याला जास्त आवडत.

singer avdhoot gupte farm house
singer avdhoot gupte farm house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here