तुझ्यात जीव रंगला मालिकेतून महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचलेली अभिनेत्री अक्षया देवधर हीच अभिनेता हार्दिक जोशी ह्याच्याशी लवकरच लग्न होणार आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांनी साखरपुडा देखील केला होता. तुझ्यात जीव रंगला या एकाच मालिकेत राणा आणि अंजली ह्यांची आगळी वेगळी लव्ह स्टोरी पाहायला मिळाली. पण मालिका साकारताना ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं आणि आता हे दोघे लग्न बंधनात देखील अडकणार आहेत. अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्या लग्नाचा थाट पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. आता त्यांची लग्नघटिका जवळच येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अक्षया देवधर हिचे काही फोटो तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.

आज अभिनेत्री अक्षया देवधरच्या हिच्या घरी ग्रहमक केळवण पार पडले ह्या वेळी तिचा संपूर्ण परिवार आई, वडील, बहीण तिच्या सोबत पाहायला मिळाला. अभिनेत्री अक्षया देवधर हिचे वडील पुण्यातील नागनाथ पार ह्या परिसरात गणपती मंदिराजवळ एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. हा पार पडलेला सोहळा देखील पुण्यात वडिलांच्या घरीच झाला असल्याचं समजत. अभिनेत्री अक्षया देवधर मूळची पुण्याची असली तरी कामानिमित्त तुला कधी मुंबई तर कधी कोल्हापूर अश्या ठिकाणी राहावं लागत पण जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून ती पुण्याला आपल्या घरी येताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी पुण्यातील गुडलक कॅफेजवळ सौदामिनी हँडलूम यांच्याकडे लग्नासाठी खास साड्या तयार केल्या गेल्या. आपल्या लग्नात आपण ज्या साड्या नेसणार आहोत त्यामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्रेम असावे असा अक्षयाचा अट्टाहास होता म्हणून एक सोहळा तिने आयोजित केला होता. हार्दिकने देखील अक्षयाच्या साडीचे काही धागे धागे हातमागावर विणलेला पाहायला मिळाले. त्यापासून बनवलेली साडी आज अभिनेत्री अक्षया देवधर हिने परिधान केलेली पाहायला मिळाली.

अक्षयाने इंस्टाग्रामवरून आपल्या लग्नाच्या पत्रिकेचा एक फोटो शेअर केला होता. मात्र लग्नाची तारीख जाहीर करण्याचे तिने यावेळी टाळलेले पाहायला मिळाले. त्यावरून २५ नोव्हेंबर रोजी हे दोघेही विवाहबद्ध होणार अशी चर्चा रंगली. त्या ‘दिवशी तुम्ही तयार आहात का मला नवरीच्या गेटअपमध्ये बघायला’. असे कॅप्शन देऊन तिने निळ्या रंगाच्या साडीत नटलेला एक व्हिडिओ शेअर केला होता.शुक्रवार २५ नोव्हेंबर २०२२ रोजी हार्दिक आणि अक्षया दोघेही विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली होती. मीडियाने देखील ही बातमी कव्हर केली होती. मात्र काही कारणास्तव हे लग्न आता पुढे ढकलले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ह्यांचे लग्न कधी होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर उपस्थित राहिला होता. पुण्यातील कर्वेरोडवरील पंडित फार्म्स येथे त्यांचं शाही थाटात लग्न पार पडणार आहे. आपल्या लग्नासाठी त्यांनी हे फार्म हाऊस का निवडलं याचं कारण हार्दिकने चला हवा येऊ द्या च्या मंचावर सांगितलं होतं. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सेलिब्रिटी जोडप्याचं याच ठिकाणी लग्न पार पडलं होतं. त्यावेळी हे फार्म हाऊस अक्षया आणि हार्दीकला देखील खूप आवडलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणाला भेट देऊन त्यांनी इथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.