Home New Serials स्टार प्रवाह वरील ह्या मालिकाना प्रेक्षक दाखवतायेत आपली पसंती

स्टार प्रवाह वरील ह्या मालिकाना प्रेक्षक दाखवतायेत आपली पसंती

2653
0
star pravah serial aai kuthe kay karte
star pravah serial aai kuthe kay karte

मराठी मालिका म्हटलं कि झी मराठीचं नाव पहिलं घेतलं जातं. झी वाहिनीने अनेक वर्ष मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण गेल्या काही वर्षांपासून झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांना पाहिल्यासारख्या दर्जेदार वाटत नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आता दुसऱ्या मालिकांना आपली पसंती दर्शवलेली पाहायला मिळते. त्याच त्याच मालिका पाहण्यापेक्षा आता मराठी प्रेक्षक नव्या मालिकांतील घडामोडी पाहण्यासाठी वळलेला पाहायला मिळतोय. त्यात काही मालिका प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलेल्या पाहायला मिळतात.

sahkutumb sahparivar serial

सहकुटुंब सहपरिवार हि मालिका प्रेक्षकांना अगदी आपल्या आयुष्याच्या घडामोडीना उजाळा दिल्यासारखीच वाटतेय. मालिकेत प्रमुख भूमिका साकारतायेत अभिनेते सुनील बर्वे, नंदिता पाटकर, आकाश नलावडे, वैभव बर्वे, किशोरी आंबिये, कोमल कुंभार, साक्षी महेश. मालिकेचं वैशिष्ठ म्हणजे हि मालिका आपल्या परिवाराला कश्याप्रकारे मदत करून एकमेकांना परिवाराशी जोडून आणि जुवळुन घेतात हे दाखवण्याच्या प्रयत्न करते. इतर मालिकांप्रमाणे मालिका वाढवावी ह्यापेक्षा ह्या मालिकेने आपला दर्जा राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. मालिकेत हसावे फुगवे ह्यांची योग्य सांगड घातलेली पाहायला मिळते. अभिनेते सुनील बर्वे, नंदिता पाटकर, किशोरी आंबिये ह्या दिग्गज कलाकारणसोबत नवोदित कलाकारांनीही अगदी उत्तम अभिनय साकारलेला पाहायला मिळतोय. मालिकेत नवोदित कलाकार आकाश नलावडे आणि कोमल कुंभार म्हणजेच प्रशांत आणि अंजली ह्यांची जोडी विशेष लक्षणीय ठरत आहे. दोघांची केमिस्ट्री मालिकेला नवा रंग चढवताना दिसते. घरातील माणसांना एकमेकांपासून तोडण्यापेक्षा कसं जोडता येईल ह्याच एक उत्तम उदाहरण ह्या मालिकेतून पाहायला मिळते.

प्रेक्षकांना आणखी एक मालिका विशेष पाहायला आवडते त्या मालिकेचं नाव आहे “आई कुठे काय करते”. सहकुटुंब सहपरिवार ह्या मालिकेप्रमाणेच आई कुठे काय करते हि मालिका देखील स्टार प्रवाहवर प्रकाशित होते. मालिकेत प्रमुख भूमिका मिलिंद गवळी आणि अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुळकर ह्यांनी साकारल्या आहेत. अनिरुद्ध आणि अरुंधती ह्यांच्या परिवाराची कहाणी ह्या मालिकेत पाहायला मिळते. मालिकेत अरुंधतीने आपले संपूर्ण जीवन आपल्या पती आणि मुलांसाठी समर्पित केलेले पाहायला मिळते. मालिकेत एक सामान्य महिला आपल्या कुटुंबासाठी आपले जीवन आपल्या स्वतःसाठी न जगता आपल्या परिवाराच्या भल्यासाठी व्यतीत घालवते पण तिला त्या कामाबद्दल आदर आणि आपुलकी मिळत नाही हि गोष्ट ह्या मालिकेत पाहायला मिळते. आई कुठे काय करते ह्या मालिकेच्या नावातच बरच काही सांगण्याचा प्रयत्न असल्याचं समजून येते. स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी अरुंधती पुढे काय करणार ह्याची उत्सुकता प्रेक्षकाना मालिकेशी ओढून घेते. त्यामुळे “सहकुटुंब सहपरिवार” आणि “आई कुठे काय करते” ह्या दोन्ही मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here