Home Entertainment आई वडील गमावल्यानंतर भावुक झालेल्या मराठी अभिनेत्रीने सांगीतला आपल्या यशामागचा प्रवास

आई वडील गमावल्यानंतर भावुक झालेल्या मराठी अभिनेत्रीने सांगीतला आपल्या यशामागचा प्रवास

6651
0
shefali actress kajal kate
shefali actress kajal kate

नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला त्यात अनेक कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने तर तब्बल तीन पुरस्कार आपल्या खात्यात जमा केले होते. अर्थात हे त्यांच्या मेहनतीचेच श्रेय म्हणावे लागेल. या पुरस्कार सोहळ्यात माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला जास्त पुरस्कार मिळाले उत्कृष्ट आई, बालकलाकार, मित्र, सहकलाकार .. असे बरेचसे पुरस्कार या मालिकेला देण्यात आले. मालिकेतील शेफालीचे पात्र साकारणारी अभिनेत्री काजल काटे हिने पुरस्कार मिळाल्याबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

actress kajal kate
actress kajal kate

अगदी पुरस्कार स्वीकारताना देखील ती भावुक झालेली पहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच काजलच्या आई आणि वडिलांचे निधन झाले होते त्यामुळे काजल अधिकच भावनिक होऊन डोळ्यात अश्रू दाटताना दिसली. या यशाचे श्रेय सांगताना ती म्हणते की,…आई बाबा २०२१एप्रील महिन्यात कोरोनाच्या भयंकर लाटेत मला व माझ्या बहीणीला एका क्षणात सोडून गेले , आणि आमच्या आयुष्यात कायमची शांतता पसरली .मग झी मराठी ते हे प्रोजेक्ट मला मिळालं …हे मिळवणं इतकं सोप्पं नव्हतं ,ऑडिशन दिली ,परत परत ऑडिशन देऊन इतक्या सगळ्या दिगज्जां बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे सगळं घडलं आई बाबांच्या आशिर्वादा मुळे sunil vasant bhosale सरांनी माझे नाव सुचवले आणि मला पूजा कुलकर्णीचा फोन आला त्या वेळी मला काहीच कल्पना नव्हती की मी कणाबरोबर काम करणार आहे .पण सेट वर पहिलाच दिवस आणि समोर श्रेयश सर, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी सर. बरं मग कळलं की आता आपली खरी परिक्षा सुरू झालीये पण ह्या सगळ्यांनी मला कधीच जाणवू दिले नाही की मी त्यांच्या समोर नवीन आहे किंवा लहान आहे . खुप सांभाळून घेतलं मला .या पुरस्काराचं श्रेय जेवढं माझ्या आई बाबांना जातं तेवढंच माझ्या सगळ्या सहकलाकारांना देखील जातं.

actress kajal kate with zee awards
actress kajal kate with zee awards

एक व्यक्ती ज्यांच्या मुळे शैफाली ला तुम्ही सगळे इतकं प्रेम देताय ती व्यक्ती म्हणजे अजय मयेकर, This man has made me from nothing to everything by teaching me small small things ,this was possible just becoz of our director/producer Ajay Mayekar sir , and the most important part of my journey my family my husband my mother-in-law my sister my brother-in-law who always had trust on me that one day I will definitely achieve my dreams स्नेहा अशोक मंगल, प्रतीक कदम, ऋषिकेश शेलार, करून कदम and my sister-in-law of course who always encourages me वैष्णवी बोरकर Thank you my audience my insta family for loving me unconditionally .I promise I will work hard and will entertain you by playing different shades on television. I love you पूजा कुलकर्णी for always being der by my side my onset bestie. Mumma pappa I hope you both are feeling proud as I have started my journey to achieve our dreams those dreams which we’ve seen together . And last but but not the least my lil munchkin मायरा वायकुळ love you pillu thank you khup bolle Thank you so much Nilesh Mayekar sir ,Padma mam and झी मराठी for accepting me as a new member of this zee family. आणि माझे चाहते यांचे खूप खूप आभार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here