देवमाणूस मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू झाल्यापासूनच त्या मालिकेबद्दल वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. देवमाणूस’मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं आहे. देवमाणूस मालिकेत रोजच नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहत्यांची उत्कंठा अतिशय जास्त वाढवली आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. डॉक्टर,आजीपासून ते आत्ता नव्याने आलेल्या आर्यापर्यंत. या मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवीसिंग म्हणजेच डॉ’क्टरने अनेक नि’ष्पाप म’हिलांना आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि एवढ्यावरच न थांबता त्याने कित्येक निष्पाप जीवांचे बळी देखील घेतले आहेत.

पण एसीपी दिव्या सिंग मुळे आता तो चांगलाच अडकला आहे. त्याच्या पापाचा घडा भरल्याने तो आता कोर्टात उभा राहिलेला दिसून येतो. डॉक्टर चे हे सगळे गुन्हे सर्वांसमोर आणण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी मालिकेत एका सरकारी महिला वकीलची एन्ट्री झाली आहे. ती डॉक्टर ला अडकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहे. या वकीलच नाव आर्या अस आहे. पण डॉक्टर ला अडकवता अडकवता वकील च डॉक्टर च्या जाळ्यात अडकतो की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हा’यरल झाला आहे. आणि ह्याच व्हिडिओ मुळे डॉक्टर आणि आर्या चर्चेत आल्याचे दिसून येते. त्यांच्या ह्या व्हिडिओ मधे आर्या आणि डॉक्टरसोबत दिसत आहेत. आणि त्या व्हिडिओ मुळे आर्या पण आता डॉक्टर च्या जाळ्यात अडकल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र हा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे.
या दोघांनी सेटवर मजामस्ती करत असताना हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडिओ मधे आर्या पुढे पळत आहे तर डॉक्टर तिच्या मागे मागे येत आहे. आणि पुढे पळताना आर्याच्या चेहऱ्यावर एक लाजर हास्य दिसून येत आहे. ती पुढे जात आहे तर डॉक्टरच्या मागे मागे येत आहे. आणि पाठीमागे ‘देवमाणूस’ चं संगीतसुद्धा वाजत आहे. असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असंचं वाटत आहे, की हा मालिकेतील एक भाग आहे. आणि आर्या डॉक्टरच्या जाळ्यात अड’कली आहे. मात्र असं नाहीय हा व्हिडीओ कलाकारांच्या ऑफस्क्रीन धम्मालचा आहे. सध्या तरी आर्या डॉक्टरच्या जाळ्यात आलेली नाहीय. मात्र पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.