येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत चिन्यासोबत ट्रेनमध्ये घडलेल्या अपघातामुळे मालिका पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक प्रेक्षकांनी ह्यावर अक्षेप देखील घेतला होता. मोहित साकारणारा अभिनेता निखिल राऊत ह्याला प्रेक्षकांनी चांगलंच धारेवर धरलं होत. स्वतः निखिल राऊतला ह्या गोष्टीचा उलगडा करावा लागला “मी एक अभिनेता आहे मला जे लिहून दिलय तसाच अभिनय करावा लागतो. चांगलं आणि वाईट सर्व गोष्टीची मला जाण आहे. मालिकेला फक्त मनोरंजन म्हणून पहावं अस तो म्हणाला. आज आपण मालिकेत चिन्याचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्या बद्दल जाणून घेणार आहोत.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत चिन्याचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे “अर्णव राजे”. मालिकेत त्याने उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळतोय. अर्णवला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अर्णव राजेचे वडील जयेश राजे”” हे देखील अभिनेते आहेत. त्यांनी काही शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला आहे. “रेस्ट इन पीस” ह्या सिरीज मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. वडील अभिनेते असल्यामुळे अभिनयाचे धडे लहानपणापासूनच अर्णवला मिळाले. अर्णवने रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागातून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने “भाग धन्नो भाग” ह्या एकांकिकेत भाग घेतला होता. माझ्या कुटुंबामुळे मला अभिनय क्षेत्रात काम करायची ऊर्जा मिळते असे तो म्हणतो. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर ह्यांनी अर्णवचे एकांकिकेतील काम पहिले होते. त्यांच्याच सांगण्यावरून अर्णवला येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत चिन्याच पात्र साकारायला मिळालं. ह्या मालिकेमुळेच आज अर्णवला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेता अर्णव राजेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…