Home Entertainment माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं...

माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी

1037
0
actress urmila nimbalkar
actress urmila nimbalkar

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर लवकरच आई होणार आहे. तिचे फोटो ती नेहमी सोशिअल मीडियावर शेअर करते त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करताना ट्रोल होत होती. ‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ ‘एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’? ‘कोणाला काय पोटं येत नाहीत का? मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रीयांनीच पाठवल्यात स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. असं तिने मांडलेलं मत काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय ठरला होता त्यावर अनेकांनी तिची साथ देखील दिली होती.

actress urmila nimbalkar
actress urmila nimbalkar

नुकतंच तिने तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. ती म्हणते “तर झालं असं..एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायर ची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी एक ब्रँडेड लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिक मुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला. परवा त्याच ब्रॅण्डचा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो! अशी घटना तिने चाहत्यांशी शेअर केली आहे. अनेकांनी ह्या गोष्टीच कौतुक करत तू पुन्हा मराठी मालिकांत लवकरच येशील अशी आशा दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here