बिगबॉस मराठीच हे ४ थ सीजन सुरु आहे. ह्या सिजनमध्ये कोणत्याही स्पर्धकाला प्रेक्षकांचं लक्ष वेधता आलं नाही त्यामुळेच हा सीजन फेल गेल्याच बोललं जातंय. सुरवातीपासूनच एकमेकांवर आरडा ओरडा करत ह्या सिजनची सुरवात झाली. काही दिवसांपूर्वी ‘खुल्ला करायचा राडा’ हा टास्क खेळण्यात आला. किरण माने, यशश्री मसुरकर, विकास आणि प्रसाद या चौघांनी हा टास्क खेळण्याचा निर्णय घेतला. या टास्कमध्ये स्पर्धकाला एका जागेवर टिकून राहायचे होते. त्यात विरोधी टीम त्यांना उठवण्यासाठी कचरा, शॅम्पू, साबण असे वाटेल ते टाकून उठवायचा प्रयत्न करत. हा टास्क करताना किरण माने ह्यांनी उत्तम खेळ केलेला पाहायला मिळाला. ह्या सर्व स्पर्धांमध्ये अभिनेते किरण माने ह्यांची प्रेक्षकांवर छाप पडली. ते खरोखरचं तो टास्क उत्तम खेळले.

त्यानंतर अक्षय आणि अमृता धोंगडे ह्यांचं किचनमध्ये चांगलंच भांडण झालेलं पाहायला मिळाले. महेश मांजरेकरांच्या ऑल इज वेलला फाट्यावर मारत घरात चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला. कालच्या भागात तर ह्या स्पर्धकांनी हद्दच पार केलेली पाहायला मिळाली. खेळ खेळताना अक्षयने तेजस्विनीला ज्या प्रकारे पकडलं होत त्यावर ती जोरजोरात ओरडत तू बाजूला हो मला पकडू नकोस असं म्हणत होती तरीदेखील तिच्या मदतीला कोणीच आलं नाही शेवटी अमृता धोंगडे पुढे येऊन आता बस झालं म्हणू लागली पण तिलाही अक्षयने पकडलं. किरण माने सारखे जेष्ठ अभिनेते समोर असूनही त्यांनी अक्षयला ठेवलं नाही. झालेल्या सगळ्या प्रकारावर प्रेक्षक चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्यक्त होत अनेकांनी तेजस्विनीने खेळाडूवृत्ती दाखवत अक्षयला माफ जरी केले असले, तरी कालच्या टास्कमध्ये अक्षयने तिला ज्या रीतीने पकडले होते त्यावर अक्षयला चंगच धारेवर धरलेलं पाहायला मिळतंय. अक्षय चुकीचा आहे महेश सर नी त्याला बोलायला पाहिजे अश्या अनेक प्रतिकिया आता उमठू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महेश मांजरेकर ह्यावर काय ऍक्शन घेणार ह्यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.