वैद्यकीय क्षेत्रातील बरेचसे कलाकार मराठी, हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब अजमावताना दिसतात. कारण ग्लॅमरस दुनिया आणि अभिनयाची आवड त्यांना तिथपर्यंत येण्यास भाग पाडते. परंतु सर्वांनाच या सर्वानाच पुरेसे यश मिळतेच असे नाही. याला अपवाद काही कलाकार ठरले आहेत जसे की अभिनेत्री मयुरी देशमुख. मयुरी ही डेंटिस्ट असूनही ग्लॅमरस दुनियेतच ती सध्या व्यस्त झालेली पाहायला मिळत आहे. मराठी चित्रपट अभिनेता “आशिष गोखले” हा देखील डॉक्टर आहे. गेल्या वर्षभरापासून तो अभिनय क्षेत्राला थोडेसे बाजूला सारून डॉक्टर असण्याची आपली जबाबदारी सांभाळताना दिसत आहे. डॉ आशिष गोखलेने मधल्या काळात अनेक लोकांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

महामारीच्या भीतीमुळे अनेकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे या काळात त्यांच्याशी बोलून सकारात्मक ऊर्जा निर्माण कशी करावी याचे वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. पेशाने डॉक्टर असलेला आशिष गेल्या वर्षापासून रुग्णांची सेवा करून कौतुकाची थाप मिळवत आहे. आशिषने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. गब्बर इस बॅक चित्रपटात त्याने अक्षय कुमार सोबत काम केले होते. तारा फ्रॉम सातारा या हिंदी मालिकेत बरेचसे मराठी कलाकार झळकले आहेत. त्यात आशिष गोखले ने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. लग्न कल्लोळ या सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातही त्याने काम केले आहे. हिंदी लोकप्रिय मालिका कुमकूम भाग्य या मालिकेतूनही त्याला अभिनयाची संधी मिळाली आहे. चेहऱ्यावरचा मेकअप उतरून तो सध्याच्या परिस्थितीत रुग्णांची सेवा करण्यात व्यस्त असलेला पाहायला मिळतो. याची दखल मीडियाने देखील घेतल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होताना दिसत आहे. यासाठी आशिष गोखलेचे कौतुक करावे तेवढे कमीच त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि आभार…