Home News माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील या कलाकाराने मुलाच्या आजारपणासाठी मागितली मदत

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील या कलाकाराने मुलाच्या आजारपणासाठी मागितली मदत

5613
0
mazya navryachi bayko actor
mazya navryachi bayko actor

माझ्या नवऱ्याची बायको, तारक मेहता का उलटा चष्मा, तू माझा सांगाती, लव्ह लग्न लोचा अशा विविध मालिकांमधून अभिनेता अतुल विरकरने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीला कामाच्या शोधात असताना सिद्धिविनायकमंदिरातील एका अनुभवी भटजीकडून त्याविषयीचे शास्त्रीय शिक्षण घेतले आणि भटजीचा व्यवसाय करायचा ठरवले हा व्यवसाय करताकरता मोठमोठ्या कलाकारांकडे सत्यनारायण पूजा आणि गणपती पूजेसाठी त्याला बोलवण्यात येऊ लागले अभिनयाची आवड तर त्याला सुरुवातीपासून होतीच त्यामुळे इथूनच त्याच्या अभिनयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला.

mazya navryachi bayko actor atul virkar

गंगुबाई नॉनमॅट्रिक, तुंबाडाचे खोत, जॅकी श्रॉफ च्या हृदयनाथ मध्ये त्याला अभिनयाची संधी मिळाली. हा प्रवास चालू असतानाच आज तो आपल्या प्रेक्षकांना एका मदतीचे आवाहन करताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नाहीये त्यामुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. त्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे त्याचा मुलगा प्रियांशला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. अभिनेता अतुल वीरकर सध्या ठाण्यातील वर्तकनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याचा मुलगा प्रियांश एक महिन्याचा होता त्यावेळी त्याला फिट आली होती. या फिटमध्ये मुलाला डेव्हलपमेंट डीले डिसऑर्डरचा त्रास होऊ लागला. या आजारामुळे त्याला त्याची मान नीट पकडता येणे अशक्य झाले आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करून अतुल वीरकर यांनी अधिक माहिती दिली आहे ती पुढीलप्रमाणे… “कृपया माझ्या मुलासाठी मदत करा .. प्रियांशची ऑक्यूपेशनल थेरेपी आजपासून सूरू झाली….ही आठवड्यात तीन वेळा होणार आहे…..या थेरेपीचा खर्च 1000 ते 1500 रू असून महिन्याला 9000रू खर्च असेल…नेदरलॅंवरून प्रियांशची औषध नुकतीच आली..प्रियांश हा अलन हार्डनून ड्यूडली सिन्डम्स या आजाराने ग्रस्त असलेला जगामधला 23 वा आणि भारतामधला 1ला मुलगा आहे….तसेच हाॅस्पिटलच येत्या 6 महिन्याचा खर्च 50 हजार रुपये असणार आहे….आपण नेहमी राजकीय टीकाटिप्पणी करतच असतो माझ्या कुटुंबाला तुमचा आधाराची गरज आहे…आपल्या एकवेळच्या चहा आणि नाष्टाच्या किमतीचा आधार पण माझ्या मुलाचे आयुष्य वाचवू शकते. आत्तापर्यंत फेसबुकच्या मित्रांनी आथिक मदतीचा हात दाखवून माझ्यावरचा प्रेम दाखवलत…असच सहकार्य पुढेही असूद्या!!!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here