वर्षाला एकापाठोपाठ एक चित्रपट साकारणारा कलाकार जेव्हा चित्रपटातून खूप कमी वेळा प्रेक्षकांसमोर येतो त्यावेळी लोक त्या कलाकाराला तू कुठं आहेस? काय करतोस? असे प्रश्न विचारू लागतात. असेच काहीसे बॉलिवूड चित्रपट अभिनेता “आशिष विद्यार्थी” यांच्याही बाबतीत झालेले पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड खलनायक म्हणून परिचित असलेले आशिष विद्यार्थी चित्रपटापासून काहीसे दूर झालेले पाहायला मिळत आहेत. केवळ बॉलिवूडच नव्हे तर तमिळ, तेलगू, मल्याळम यासारख्या तब्बल ११ भाषिक चित्रपटातून त्यांनी त्यांच्या अभिनयाचा दरारा कायम राखून ठेवला होता.

असं म्हणतात की अक्षय कुमार प्रेक्षकांसमोर एकापाठोपाठ एक चित्रपट आणतात मात्र आशिष विद्यार्थी देखील असे अभिनेते आहे ज्यांनी वर्षाला ४ ते ५ चित्रपटातून काम केले आहे. अभिनयाचा एवढा दांडगा अनुभव असलेले आशिष विद्यार्थी सध्या एका वेगळ्याच क्षेत्रात व्यस्त असल्याने ते हल्ली फारशा चित्रपटातून पाहायला मिळत नाहीत. यावरून अनेकांनी त्यांना तुम्ही कुठे आहात? हल्ली चित्रपटात दिसत नाहीत? काय करतोस? या प्रश्नांचा भडिमार केला होता. या प्रश्नांची त्यांनी नुकतीच उत्तरे दिली आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनाबद्दल काय खुलासा केला आहे ते देखील जाणून घेऊयात.. आशिष विद्यार्थी यांनी आजवर अनेक चित्रपट साकारले परंतु काही काळानंतर ते एका चांगल्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांच्याकडे ‘बॉलिवूड डायरीज’ हा एक अतिशय उत्तम चित्रपट चालून आला. हा चित्रपट त्यांनी अभिनित करायचे ठरवले या नंतर 24, सिजन 2 हे आणखी काही चित्रपट त्यांना मिळाले. आता काम मिळतंय मात्र जीवनात आणखी काहीतरी करायचंय या उद्देशाने त्यांनी आपल्याला जे साध्य करायचंय त्याचा विचार केला.

मागील सहा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. चांगले चित्रपट करण्यासोबत त्यांना आयुष्यात आणखी एक काम करायचे ठरवले होते याउद्देशाने ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी एक कंपनी सुरू केली ज्याचे नाव आहे Ashish Vidyarthi and Associates. यातून ते avid miners नावाने टॉक्स देतात ज्याला आपण मोटिवेशनल स्पीच म्हणतो. हे काम जेव्हा मी सुरू केले तेव्हा माझ्याकडे खूप चांगल्या चांगल्या चित्रपटांची ऑफर येऊ लागली. बॉलिवूड डायरीज हा त्यानी अनेक वर्षानंतर साकारलेला चित्रपट. मी खूप नशीबवान आहे मला राजोशीसारखी बायको मिळाली (राजोशी विद्यार्थी या टीव्ही मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात). मला गर्व आहे की माझा मुलगा अर्थ अभिनय क्षेत्रात नाही. तो एक अत्यंत हुशार मुलगा आहे. त्याने कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आयुष्यात तुम्हालाजे काही मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यावा लागतो या गोष्टी आपणहून तुमच्याकडे कधीच चालून येत नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.