मराठी तसेच हिंदी मधील प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड ह्या पुण्यातील फॉरचून वास्तुशिल्प गृहप्रकल्पाची गेली ५ वर्ष ब्रँड अँबॅसिडर आहेत. निशिगंधा वाड ह्या क्वचितच एखाद्या जाहिरातीत पाहायला मिळतात. प्रॉडक्ट चांगलं असेल तरच आपण जाहिरात करणार अशी त्यांची संकपणा. जाणून पारखून घेतल्याशिवाय त्या कोणत्याही जाहिरातीत काम करताना पाहायला मिळत नाही. आपल्याला गृहप्रकल्प आवडला त्यांचं बांधकाम करण्याची पद्धत आवडली त्यामुळेच त्यांनी ह्या प्रकल्पासाठी सहभाग दर्शवला आणि गेली ५ वर्ष फॉरचून वास्तुशिल्प ह्यांच्या अनेक प्रोजेक्मध्ये त्या सहभागी झाल्या.

फॉरचून वास्तुशिल्पचे सर्वे सर्वा नितीन धिमधिमे आणि मकरंद पांडे हे गेल्या २० वर्षांपासून बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत. आजवर जवळपास ५० हुन अधिक गृहप्रकल् त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. आजवर त्यांना अनेक बक्षिसांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. “स्वस्त दरात उत्तम बांधकाम आणि सुंदर प्रकल्प” अशी त्यांनी व्याख्याच निर्माण केली आहे. लीगल N.A. प्लॉट्स, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट ह्या सर्वात फॉरचून वास्तुशिल्प अग्रेसर असलेले पाहायला मिळते. गेल्या २० वर्षात त्यांनी ग्राहकांना दिलेली सेवा हेच त्यांचं यश असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

