सारेगमप लिटिल चॅम्प च्या मंचावर काही दिवसांपूर्वी अभिनेते सुबोध भावे यांनी हजेरी लावली. त्यावेळी आपली लोककला, लावणी, भारूड ह्यांना किती महत्व आहे हे समजून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सोशिअल मीडियावर अनेक मंडळी वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर कोणीच काही बोलत नाही असं म्हणताना पाहायला मिळतात. सामान्य माणसाच्या खिशाला परवडणार नाही इतकी किंमत झाली तरी अभिनेते ह्यावर कधी काहीच बोलत नाहीत म्हणून कि काय आज अभिनेते सुबोध भावे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर त्याना काय वाटत हे लिहलं.

अति पाऊस आणि सलग २ वर्षांपासून ह्या महामारीमुळे सामान्य लोक हैराण झालेत. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. मिळेल ते काम हाती घेऊन लोक काम करतायेत पण अश्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अन्नधान्य, वस्तू यांच्या निर्यातीचा खर्च देखील वाढला त्यामुळे महागाई आता परवडणारी झालीय. त्यामुळे नेटकरी अभिनेते तरी किमान काही बोलतील ह्या आशेने त्यांनी लिहलेल्या पोस्टवर किंवा फोटोंवर कमेंट करून पेट्रोल आणि डिझेल बद्दल काहीतरी बोला असं अनेकदा लिहताना पाहायला मिळतात. म्हणूनच कि काय अभिनेते सुबोध भावे यांनी हि पोस्ट लिहली त्यात ते म्हणतात “सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही …..कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद… ” काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी सायकल भेट दिली. (वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीचा तर हा परिणाम नसेल?असो….सायकल आहे फार सुंदर आणि अर्थात उत्तम आरोग्याला उपकारक!) असं म्हणत सायकल सोबतच फोटो शेअर केला होता.