Home Entertainment आयुषी आणि सुयश टिळक यांचं नुकतंच झालं लग्न…लग्नसोहळ्याचे फोटो झाले व्हायरल

आयुषी आणि सुयश टिळक यांचं नुकतंच झालं लग्न…लग्नसोहळ्याचे फोटो झाले व्हायरल

3492
0
ayushi bhave and suyash tilak
ayushi bhave and suyash tilak

अभिनेत्री आयुषी भावे आणि अभिनेता सुयश टिळक यांचा आज २१ ऑक्टोबर रोजी विवाहसंपन्न झाला आहे. आयुषी आणि सुयश टिळक यांनी आपल्या आयुष्याची आता खरी सुरुवात झाली आहे असे आपल्या चाहत्यांना कळवले आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर , मृणाल देशपांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सुयश आणि आयुषीच्या लग्नाला आज हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. हर्षदा खानविलकर आणि मृणाल देशपांडे हे सुयशला आपला मुलगा मानतात . पुढचं पाऊल या मालिकेतून या दिघांची झालेली ओळख आजपर्यत त्यांच्यातल नातं अधिक घट्ट निर्माण करताना दिसली.

ayushi and suyash haldi photos
ayushi and suyash haldi photos

काही आठवड्यापूर्वी या दोन्ही अभिनेत्रींनी सुयश आणि आयुषीचे केळवण केले होते. तर १९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याची सुरुवात झाली. १९ तारखेला हळद आणि मेहेंदीचा सोहळा पार पडला. काल २० ऑक्टोबरला त्यांचा संगीत सोहळा संपन्न झाला. यश सोहळ्यातील त्यांच्या नृत्याची झलक दाखवणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यांचा मेहेंदि सोहळा आणि हळदीचा सोहळा पार पडला त्यावेळी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात सुयशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता तर आयुषी पिवळ्या रंगाच्या साडीत अधिकच खुलून दिसली होती. मेहेंदि आणि हळदीच्या सोहळ्यात त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आमंत्रित केले होते. या दोघांना आयुष्याच्या या नव्या वाटचालीला सेलिब्रिटींकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ह्या जोडीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्याच्या उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून होती आणि आता नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.

actresh ayushi and actor suyash wedding
actresh ayushi and actor suyash wedding

आयुषी हि एक अभिनेत्री असून तिने २०१८ साली श्रावण क्वीनचा किताब मिळवला होता. ह्याच बरोबर ती झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये देखील झळकली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी मराठी चित्रपटातही दिसणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे “या गावच कि त्या गावच”. आयुषी भावे हि एक उत्तम डान्सर असल्याने तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. बरखा या व्हिडीओ सॉंग मधून देखील ती प्रेक्षकांसमोर आली आहे. का रे दुरावा, पुढचं पाऊल या मालिकेमुळे सुयशला प्रसिद्धी मिळाली होती. दरम्यान सुयश टिळक शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत झळकला आहे. आयुषी आणि सुयशला आयुष्याच्या या नवीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here